घरमुंबईकेईएममधील प्रिन्सची मृत्यूशी झुंज कायम

केईएममधील प्रिन्सची मृत्यूशी झुंज कायम

Subscribe

केईएममध्ये दोन आठवड्यांपूर्वी व्हेंटिलेटरच्या वायरमध्ये आग लागल्यामुळे भाजलेल्या प्रिन्सची अजूनही मृत्यूशी झुंज कायम आहे. तरीही, हॉस्पिटल प्रशासनाकडून प्रिन्सच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. पण, सध्या प्रिन्सची प्रकृती पाहता त्याच्या अनेक हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. केईएम हॉस्पिटलमधून मिळालेल्या माहितीनुसार, प्रिन्सच्या रिपोर्टमध्ये न्यूमोनिया असल्याचे समोर आले आहे. शिवाय, त्याच्या खाण्या-पिण्यावरही मर्यादा आल्या आहेत. तसेच आज, संध्याकाळी त्याला शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. आयव्ही बहुदा मानेतून देतील, असे समजते. त्याला सेंट्रल लाईन इन्सेशन म्हणतात. यावेळी ईएनटीदेखील टीमसोबत होती. दरम्यान, फुफ्फुसामध्ये न्यूमोनियाचा पॅच दिसून आला असून त्याचे पोट फुगले असल्याची माहिती मिळते.

प्रिन्सच्या जखमांना संसर्ग होऊ नये म्हणून डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण, अजूनही प्रिन्सची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर आयसीयूत व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. तसेच, प्लास्टिक सर्जनकडून त्याच्यावर मलमपट्टी केली जाते. तसंच, त्याला ऐकू येत आहे की नाही त्याची देखील तपासणी केली गेली. दरम्यान, प्रिन्सच्या छातीच्या एक्स-रेमध्ये एक छोटा बिंदू आढळला असून तो न्यूमोनियाचा असू शकतो, असेही डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. पोटाचे कार्यही मर्यादित झाल्यामुळे त्याच्या खाण्यावर बंधने आली आहेत. पण, सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला न्यूमोनिया झाल्याचे केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

केईएम हॉस्पिटलच्या बालरोग विभागात दोन आठवड्यांपूर्वी मध्यरात्री अचानक शॉर्टसर्किट झाले. या घटनेत केईएममध्ये हृदयावर उपचार घ्यायला आलेला अडीच महिन्यांचा चिमुरडा प्रिन्स गंभीररित्या जखमी भाजला. प्रिन्स हा उत्तर प्रदेशमधून मुंबईत दाखल झाला आहे. तर, या आगीच्या लोटात अडकल्याने प्रिन्सचा एक हात आणि एका बाजूचा चेहरा भाजला आहे. त्याच्या हाताला संसर्ग झाल्यामुळे शस्त्रक्रिया करुन प्रिन्सचा हात काढण्यात आला आहे.

हेही वाचा –

सत्ता स्थापनेच्या दिशेने दिल्लीत जोरदार हालचाली; संजय राऊत – राष्ट्रवादी भेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -