घरमुंबईत्या तळीराम एसटी चालकाची अखेर हकालपट्टी!

त्या तळीराम एसटी चालकाची अखेर हकालपट्टी!

Subscribe

पुण्यातील घटनेची गांभिर्याने दखल घेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

पुण्यात मद्यधुंद अवस्थेत शिवशाही बस चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या बस चालकाला अखेर आज एसटीमहामंडळाने बडतर्फ केले. त्याबाबतचे निर्देश खुद्द परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाला दिली. तसेच यापुढेही अशा घटनेत मद्यपी चालक आढळल्यास त्याच्यावरही सेवेतून बडतर्फ करण्याबाबत कडक नियमावली राबविण्याचे निर्देश दिवाकर रावते यांनी दिले आहेत.

एसटी चालक अमोल चोले सेवेतून बडतर्फ

गुरूवारी २५ जुलै रोजी पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकातून एसटी बस चालक अमोल चोले याने मद्यधुंद अवस्थेत बेकायदेशीररित्या एसटीच्या शिवशाही बसचा ताबा घेतला. मद्यधुंद अवस्थे बेदरकारपणे बस चालविल्याने बसचा अपघात झाला. यावेळी बसमधील वाहक आणि प्रवाशांनी प्रसंगावधान राखल्याने दुर्दैवी घटना टळली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी संबंधित चालकावर कडक कारवाई करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पुण्याचे विभाग नियंत्रकांनी मद्यपी एसटी चालक अमोल चोले याला सेवेतून बडतर्फ करण्यात येत असल्याची सूचना केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘कोस्टल रोड’वरील स्थगिती कायम; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

निर्णयाचे स्वागत

”एसटीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवासामध्ये प्रवाशांना सुरक्षित व सौजन्यशील सेवा देण्याचे व्रत अंगिकारावे. उपरोक्त प्रसंगासारख्या गैर कृत्यामुळे एसटीची प्रतिमा मालिन होणार नाही याची काळजी एसटीच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन दिवाकर रावते यांनी केले. मद्यधुंद अवस्थेत एसटी चालविणाऱ्या चालकाला बडतर्फ करण्याच्या परिवहन मंत्र्यांच्या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -