घरमुंबईबिल्डर, पालिकेच्या उदासीनतेमुळे रहिवासी धोकादायक घरात

बिल्डर, पालिकेच्या उदासीनतेमुळे रहिवासी धोकादायक घरात

Subscribe

बहुतांश इमारतीच्या विकासकांनी महापालिकेकडून इमारत वापरासाठीचा आवश्यक रहिवासी दाखला न घेता आपल्या सदनिकांची विक्री केल्याने, या इमारती रहिवासी वापराकरता योग्य आहेत किंवा नाही, हे स्पष्ट झालेले नाही.

भिवंडी शहर परिसरात अधिकृत व अनाधिकृत इमारती मोठ्या संख्येने उभ्या राहिल्या आहेत. त्यापैकी बहुतांश इमारतीच्या विकासकांनी महापालिकेकडून इमारत वापरासाठीचा आवश्यक रहिवासी दाखला न घेता आपल्या सदनिकांची विक्री केल्याने सदनिकाधारकांची फसवणूक झाली आहे. या प्रकारामुळे या पालिकेकडून या इमारती रहिवासी वापराकरता योग्य आहेत किंवा नाही, हे स्पष्ट झालेले नाही. शिवाय यातील एखादी इमारत कोसळून दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असाही प्रश्न आहे. उदासीन महापालिका आणि आपले उखळ पांढरे करून घेणारे विकासक यामुळे रहिवाशांची सुरक्षितता पणाला लागली आहे. या प्रकरणी पालिका आयुक्तांच्या आदेशाने टेमघर येथील अरिहंत सिटी टॉवरच्या दोघा विकासकांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

आयुक्तांना माहिती देण्यास दिरंगाई

- Advertisement -

भिवंडी महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग एक ते पाच प्रभाग अंतर्गत इमारतींचे बांधकाम सुरू असून प्रत्येक प्रभागात आठ बीट निरिक्षक देखरेखीसाठी नियुक्त केले आहेत. असे असताना प्रभाग कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत इमारती व नवीन बांधकाम विषयीची माहिती आयुक्तांना दिली जात नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. महापालिकेकडून मालमत्ता कर आकारणी केली जाते. त्यावर विश्वास ठेवून ग्राहक सदनिका खरेदी करतात. तर अधिकृत इमारतीसाठी महापालिकेकडून परवानगी घेऊन अतिरिक्त बेकायदा बांधकाम केले जाते. त्यामुळे पालिकेकडून इमारत बांधकामासाठी परवानगी घेतलेले आणि परवानगी न घेतलेले विकासक पालिकेकडून इमारतीचा वापर दाखला घेत नाही. त्यामुळे काही इमारती कोसळण्याचे प्रकार शहरात घडून येत आहेत.

शहरातील कल्याणरोड टेमघर येथील परिसरात बारा मजल्याचे अरिहंत सिटी टॉवर उभारणाऱ्या विकासकाने सदनिका, ऑफिस, दुकाने असे बांधकाम केले असून पालिका प्रशासनाचा रहिवास वापर दाखला न घेता परस्पर सदनिकांची विक्री केली आहे. या सदनिकांचा रहिवाशांनी वापर सुरू केला आहे. या प्रकरणी आयुक्त मनोहर हिरे यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्याने त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यामुळे प्रभाग अधिकारी सुनिल भोईर यांनी विकासक पारसमल जैन व डी.एस.भवारी यांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. मात्र पुढील कारवाई न झाल्याने महापालिकेस करापोटी मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नाला मुकावे लागत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -