घरमहाराष्ट्र'त्या' तरुणीचा चक्क अंघोळ करताना काढला अश्लिल व्हिडिओ

‘त्या’ तरुणीचा चक्क अंघोळ करताना काढला अश्लिल व्हिडिओ

Subscribe

हिंजवडी येथे संगणक अभियंता तरुणीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढल्याची घटना समोर आली आहे.

तुमचा कोणत्या क्षणी कशा अवस्थेत व्हिडिओ काढला जाईल, याचा काही नेम नाही. कारण आता व्हिडिओ कॅमेरे तुमच्या बाथरुमपर्यंत पोहोचले आहेत. याची साक्ष देणारी घटना पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी येथे घडली आहे. हिंजवडी येथे संगणक अभियंता तरुणीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कामगार भुजंग नारायण मगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गेल्या आठवड्यात घडली असून आरोपी हा जामिनावर सुटला आहे. २४ वर्षीय तरुणी हिंजवडीमधील नामांकित कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत आहे.

आरोपीला अटक आणि सुटका 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ भोपाळ-मध्यप्रदेश येथील ही तरुणी हिंजवडी येथील एका इमारतीत वास्तव्यास असून तेथे आरोपी भुजंग नारायण मगर हा खिडकी दुरुस्तीचे काम करत असे. दरम्यान, गेल्या आठवड्यात शुक्रवारी साडेचारच्या सुमारास ही तरुणी राहत असलेल्या रूमच्या बाथरूममध्ये अंघोळ करत होती. तेव्हा आरोपी हा खिडकीच्या पलीकडे काहीतरी काम करत होता. त्याचवेळी अंघोळ करत असलेल्या तरुणीचा व्हिडिओ भुजंगने आपल्या मोबाईलमध्ये चोरून घेतला. परंतू शेवटच्या क्षणी आपला कोणीतरी चोरून व्हिडिओ बनवत असल्याचे तरुणीला जाणवले. त्यावेळी संबंधीत आरोपी भुजंग हा खिडकीच्या पलीकडे दिसला. तरुणीने त्याच्याविरोधात हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी मिळाली. मात्र आता हा आरोपी जामिनावर बाहेर आला असल्याची माहिती महिला पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -