घरमुंबईटीबी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित

टीबी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित

Subscribe

टीबी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आज सकाळी आपल्या विविध मागणीसाठी बेमुदत मागण्यांसाठी आंदोलन केले होते. मात्र त्यांच्या मागण्या मान्य केल्याने टीबी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे.

टीबी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी शिवडी टीबी रुग्णालयात वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र, आता कर्मचाऱ्यांच्या या मागण्या मान्य झाल्या असून कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला स्थगिती दिली आहे.

विविध मागण्यांसाठी आंदोलन

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं. शिवडीच्या टीबी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयी प्रश्नांकडे पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याचं वारंवार सांगूनही निर्णय घेण्यात येत नव्हता. अखेर वर्षांनुवर्ष पूर्ण न झालेल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी म्युनिसिपल मजदूर युनियनच्या वतीने रुग्णालयातील कर्मचारी बेमुदत आंदोलन करणार होते. मात्र रुग्णालय प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करत लेखी स्वरुपाचं आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

- Advertisement -

योग्यत्या सुविधा मिळत नाहीत

टीबी रुग्णालयात काम करणारे कामगार, कर्मचारी, डॉक्टर आणि परिचारिकांना योग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे वारंवार लेखी निवेदन देऊनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यासाठीच टीबी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. टीबी हा संसर्गजन्य आजार असल्यानं रुग्णांच्या सोबत असणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनाही या आजाराची लागण झाली आहे. शिवाय, रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहाची योग्य ती काळजी घेतली जात नाही. मृत्यूनंतर रुग्णाचा मृतदेह शवागृहात नेण्यासाठी असलेल्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचं शेड देखील उपलब्ध केले जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात मृतदेह भिजत शवागृहात न्यावा लागतो. त्यामुळे रस्त्यावर शेड बांधावी, अशी मागणी करण्यात आली होती. पण, आता शेड बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे येत्या दोन महिन्यात या कामाला सुरूवात करण्यात येणार असल्याचं रुग्णालय प्रशासनाने लेखी आश्वासनात म्हटलं आहे.

आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. पण, रुग्णालय प्रशासनाने लेखी आश्वासन देऊन मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आंदोलनाला स्थगिती दिली आहे. शिवाय, लवकरात लवकर मागण्यांवर अवलंब केला जाईल असंही सांगण्यात आलं आहे.

– प्रदीप नारकर, चिटणीस, म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबई

या आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

  • रुग्णाचे शव शवागारात नेण्यासाठी जो रस्ता आहे, त्यावर शेड नसल्यामुळे पावसाळ्यात मृत शरीर रुग्णालयाच्या वॉर्ड मधून शवागाराकडे भिजत
    न्यावे लागते. त्यामुळे त्या ठिकाणी शेड बांधावे
  • गणवेश आणि शिलाई भत्ता त्वरीत द्यावा
  • टीबी रजा दिली पण रजेचा पगार मिळाला नाही
  • टी.एस.कंपाऊंड येथील निवास स्थानाची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी
  • सकस आहार कामाच्या ठिकाणी द्यावा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -