घरमुंबईमंत्रालयात कर्मचाऱ्यांनी घेतली राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ!

मंत्रालयात कर्मचाऱ्यांनी घेतली राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ!

Subscribe

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने आज मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली आहे.

‘राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त’ मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी, अपर मुख्य सचिव बिपिन मल्लिक यांनी आज शपथ घेतली आहे. ‘देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु, मुक्त, नि:पक्षपाती आणि शांततापूर्ण वातावरणात निवडणुकांचे पावित्र्य राखू’, अशी शपथ त्यांनी घेतली. यावेळी निवडणूक शाखेचे उपसचिव अनिल वळवी, अवर सचिव श्रीमती शुभा बोरकर, कक्ष अधिकारी गणेश कदम, सं. ना. गरुडकर यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली. त्यानिमित्ताने २०११ पासून दरवर्षी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज सर्वत्र ९ वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, मतदार नोंदणी अधिकारी तसेच मतदान केंद्र अधिकारी, अशा सर्व पातळ्यांवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -