घरमनोरंजनहार्दिक पांड्या प्रकरणावरुन, भडकली करण जोहरची आई

हार्दिक पांड्या प्रकरणावरुन, भडकली करण जोहरची आई

Subscribe

हार्दिक पांड्या प्रकरणाला करण जोहरच जबाबदार असल्याचे म्हणत, त्याच्या आईने त्याला चांगलेच झापले आहे.

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमातील हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांची मुलाखत सध्या चर्चेचा विषय बनली आहे. दोन्ही क्रिकेटपटूंनी या शोमध्ये महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे त्यांच्यावर बंदीदेखील घालण्यात आली होती. गुरुवाही BCCI कडून ही बंदी उठवण्यात आली असून, न्यूझीलंड दौऱ्यासाठी हार्दिकचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसंच लोकेश राहुलला ‘भारत अ’ संघात संधी देण्यात आली आहे. मात्र, तरीही अजून हे प्रकरण धुमसत आहे, असंच म्हणावं लागेल. याचं कारण म्हणजे या प्रकरणातील एक नवा पैलू आता समोर आला आहे. ‘कॉफी विथ करण’च्या ‘त्या’ एपिसोडवरुन सध्या जो काही वाद सुरु आहे, त्यामुळे करण जोहरची आई त्याच्यावर चांगलीच भडकली आहे. करण जोहरने स्वत: याबाबत खुलासा केला आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत करण म्हणाला की, ‘हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्याबाबत जे काही घडले, त्यामुळे माझी आई चांगलीच नाराज आणि निराश झाली आहे. इतकंच नाही तर तिने मला चांगलेच झापलेसुद्धा आहे.’ ‘हार्दिक आणि राहुलसोबत जे काही घडले त्याला कळत नकळत मीच जबाबदार असल्याचं माझी आई म्हणते’, असा खुलासा करणने केला आहे.


पाहा : सलमान खानच्या ‘भारत’चा Teaser

मुलाखतीदरम्यान करण म्हणाला की, ‘माझी आई हार्दिक पांड्याची खूप मोठी चाहती आहे. त्यामुळे मी त्याच्यासोबत असे का केले? त्याला अशाप्रकारचे प्रश्न का विचारले? असा जाब ती मला विचारते. घडल्या प्रकारात माझी खरंच काही चूक नाही असं मी तिली अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, राहुल आणि पांड्यासोबत घडत असलेल्या सगळ्या घडामोडींविषयी ती अजूनही मलाच जबाबदार पकडते.’ दरम्यान, ‘आईच्या या वागळ्याचा मला खूप त्रास होत असून, मी दुखावलो गेलो आहे’, असंही करण म्हणाला.

- Advertisement -

दरम्यान, महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे पांड्या आणि राहुलवर लावण्यात आलेली बंदी ही तात्पुरती मागे घेण्यात आली आहे. त्या दोघांचीही चौकशीतून मात्र अद्याप सुटका झालेली नाही. लवकरच याप्रकरणी लोकपाल (होमडसमन) नेमण्यात येणार असून, त्याद्वाके या दोघांची चौकशी केली जाणार असल्याचं समजतंय. याप्रकरणी ५ फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. दरम्यान, करण जोहरने केलेल्या या खुलाशामुळे ‘हार्दिक पांड्या’ प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -