घरमुंबईजागतिक पर्यावरण दिन: पर्यावरण प्रेमींची ग्रीन पोलिसांची मागणी

जागतिक पर्यावरण दिन: पर्यावरण प्रेमींची ग्रीन पोलिसांची मागणी

Subscribe

पर्यावरण दिनानिमित्त मुंबई प्रेस क्लब येथे विशेष सेमिनारमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांचा सामना करण्यासाठी ग्रीन पोलिस स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, सध्याचे पोलिस दल दैनंदिन गुन्ह्यांना अटकाव करण्यासही अपुरे असल्याने वेगळ्या दलाची आवश्यकता आहे.

मुंबई मेट्रोपोलिटन रीजनमध्ये (एएमआर) सर्वत्र मोठ्या प्रमाणावर नियोजनशून्य पद्धतीने उभी राहणारी विकास कामे इथल्या जैवविविधतेला मोठा धोका निर्माण करत आहेत, या प्रकल्पांमध्ये पर्यावरणाचा कोणत्याही प्रकारचा विचार केला गेलेला नाही. त्यामुळे यातून गंभीर परिणाम उद्भवतील, असा इशारा पर्यावरण तज्ज्ञांकडून बुधवारी दिला गेला आहे. त्यामुळे का होईना मुंबईत ग्रीन पोलिसांची गरज असल्याचे मते यावेळी व्यक्त झाली. पर्यावरण दिनानिमित्त मुंबई प्रेस क्लब येथे विशेष सेमिनारमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांचा सामना करण्यासाठी ग्रीन पोलिस स्थापन करण्याची मागणी केली. त्यांच्या मते, सध्याचे पोलिस दल दैनंदिन गुन्ह्यांना अटकाव करण्यासही अपुरे असल्याने वेगळ्या दलाची आवश्यकता आहे. पब्लिक रीलेशन्स काउंसिल ऑफ इंडियातर्फे (पीआरसीआय) कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

विकासाच्या प्रकल्पांमुळे पर्यावरणाचे नुकसान

बुलेट ट्रेन ते नवी मुंबईतील विमानतळ आणि उरणमधील स्पेशल इकोनॉमिक झोन असे अनेक प्रकल्प शहरातील निसर्गाची पायमल्ली करत उभे राहणार आहेत. कारण, या प्रकल्पासांठी खारफुटी, पाणथळ जमिनी आणि टेकड्या उध्वस्त केल्या जात आहेत, असे श्री एकविरा आई प्रतिष्ठानचे (एसईएपी) नंदकुमार पवार म्हणाले. उरणमधील पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा खारफुटीच्या जंगलांमध्ये आणि दलदलीच्या प्रदेशांमध्ये सातत्याने भराव टाकून ५००० हेक्टर इतक्या वनराई नेस्तनाबूत करण्यात येत आहे. शिवाय, यावर कोणत्याही प्रकारच्या अधिकार्‍यांनी लक्ष दिलेले नाही. एनएमएसईझेडने अयोग्य पद्धतीने भराव टाकले आहेत. मात्र, खाडीचे पाणी आपला मार्ग काढतेच. त्यामुळे, येथील १५ गावांमधील ७०,००० रहिवाशांना पुराच्या भीतीच्या छायेत जगावे लागत आहे. ‘आताही प्रचंड भरतीच्या काळात आमची पाच गावे पुराचा तडाखा सहन करतात’, असे ते म्हणाले.

- Advertisement -

‘ग्रीन पोलिसांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकजडे पाठवला’

यावेळी बोलताना द नेचर कनेक्टचे संचालक कार्यकर्ते बी. एन. कुमार म्हणाले की, ‘सामान्य नागरिकांनीही जागरुक राहून शहराला वाचवायला हवे. प्रकल्पाचे समर्थक आणि प्रशासनावर दबाव ठेवायला हवा. यासंदर्भात ग्रीन पोलिस नेमण्याचा प्रस्ताव त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला आहे. तसेच ही सूचना गृहखात्याकडेही पाठवण्यात आली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटे आणि फ्लेमिंगोच्या प्रदेशातून बुलेट ट्रेन जाऊ नये, यासाठी एसईएपी आणि द नेचर कनेक्ट यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचीही भेट घेतली आहे. या हाय-स्पीड ट्रेनमुळे ५४,००० खारफुटीही नष्ट होणार असल्याची भिती त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – जागतिक पर्यावरण दिन: चेन्नईत झाडांसाठी विशेष रुग्णवाहिका सुरु

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -