घरदेश-विदेशजागतिक पर्यावरण दिन: चेन्नईत झाडांसाठी विशेष रुग्णवाहिका सुरु

जागतिक पर्यावरण दिन: चेन्नईत झाडांसाठी विशेष रुग्णवाहिका सुरु

Subscribe

जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने चेन्नईमध्ये एक अनोखी रुग्णवाहिका सुरु करण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका झाडांसाठी सुरु करण्यात आली आहे. या रुग्णावाहिकेतून लोकांना विविध झाडांची रोपटे आणि बि-बियाणे मिळणार आहेत.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने देशभरात पर्यावरण प्रेमींकडून वृक्षरोपणाचे आव्हान केले जात आहे. याशिवाय वेगवेगळ्या सामाजिक संस्था वृक्षरोपण करत आहेत. जगभरात वृक्षरोपणाचे कार्यक्रम केले जात आहेत. दरम्यान, चेन्नईमध्ये अब्दुल घाणी या पर्यावरण प्रेमीने जागतिक पर्यावरण दिनी अनोखी रुग्णवाहिका सुरु केली आहे. त्यांनी झाडांची रुग्णवाहिका सुरु केली आहे. ही रुग्णवाहिका नागरिकांना झाडांची रोपटे, बि-बियाणे देत आहे. याशिवाय सीडबॉल देखील देत आहे.

हेही वाचा – जागतिक पर्यावरण दिनी आदिवासी बांधवांची अनोखी हिरव्या देवाची यात्रा

- Advertisement -

‘२०२० सालापर्यंत प्रत्येक जिल्ह्यात एक रुग्णवाहिकेचे ध्येय’

झाडांची रुग्णवाहिका सुरु करणाऱ्या अब्दुल घाणी यांनी एएनआय या वृतसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘आपल्या आयुष्यात झाडांचे अनन्यासाधारण असे महत्त्व आहे. परंतु, हल्ली वृक्षतोड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. झाडांचे महत्त्व लक्षात घेऊन ही संकल्पना मला सुचली. २०२० पर्यंत देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक झाडांची रुग्णवाहिका असावी, असे आमचे ध्येय आहे.’ याकार्यात अब्दुल यांना सहकार्य करणारे सुरेश म्हणाले की, ‘चक्रिवादळामुळे फार मोठे नुकसान झाले आहे. या चक्रिवादळात १०० पेक्षा जास्त झाडांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय तमिळानाडूमध्ये २०१५ साली आलेला पूर मी याची देही याची डोळा पाहिला आहे. त्यामुळे या कार्यात मी अब्दुलला मदत करण्याचे ठरवले.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -