घरमुंबईघाटांमधील वाढते अपघात रोखण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना

घाटांमधील वाढते अपघात रोखण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना

Subscribe

घाटांमधील वाढते अपघात रोखण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. आंबेनळी घाटात नुकत्याच झालेल्या गंभीर अपघाताबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी काळजी व्यक्त केली.

राज्यातील घाटांमधील वाढते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी एका तज्ज्ञ समितीची स्थापना करण्याचा निर्णय राज्य रस्ते सुरक्षा परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आंबेनळी घाटात नुकत्याच झालेल्या गंभीर अपघाताबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी काळजी व्यक्त केली. समितीमध्ये संबंधीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, रस्ता संरक्षणासंदर्भातील तज्ज्ञ आदींचा समावेश करण्यात यावा आणि समितीने सहा महिन्यात शासनास अहवाल सादर करावा, अशा सूचना यावेळी रावते यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृहावर झाली बैठक

दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक झाली. बैठकीस परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त दिपाली मासिरकर, समृद्धी महामार्गाचे मुख्य अभियंता अनिल गायकवाड, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष नितीन डोसा यांच्यासह सार्वजनिक बांधकामासंबंधीत विभागाचे अधिकारी होते.

- Advertisement -

पुणे – मुंबई महामार्गावर प्रात्यक्षिक घेण्यात येतील

नागपूर ते मुंबईदरम्यान प्रस्तावित समृद्धी महामार्गावर करावयाच्या रस्ते सुरक्षाविषयक उपाययोजनांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. समृद्धी महामार्गासाठी अधिक वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. पण त्या वेगमर्यादे इतकी वाहने आपल्याकडे आहेत का, याचा विचार करण्यात यावा. आपल्याकडील वाहनांच्या डिझाईन नुसारच वेगमर्यादा निश्चित करण्यात यावी, अशी सूचना यावेळी रावते यांनी दिली. समृद्धी महामार्गावर रस्ते सुरक्षेसाठी करावयाच्या विविध उपाययोजनांचे आधी पुणे – मुंबई महामार्गावर प्रात्यक्षिक घेण्यात यावे. त्यातील त्रुटी लक्षात घेऊननंतर त्याची समृद्धी महामार्गासह इतरही महामार्गांवर अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही रावतेंनी दिली.

महाराष्ट्रात अपघातांची संख्या ५७ टक्के

महाराष्ट्रातील ६६ टक्के अपघाती मृत्यू हे मोटारसायकल, सायकल आणि पादचाऱ्यांच्या अपघातातील आहे. अपघाती मृत्यूंच्या संख्येत देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात महामार्गांची संख्या १५ टक्के असली तरी महामार्गांवर होणाऱ्या अपघातांची संख्या मात्र ५७ टक्के इतकी आहे. इतर मार्गांवरील अपघातांची संख्या ही ३३ टक्के इतकी आहे, अशी माहिती यावेळी झालेल्या सादरीकरणात देण्यात आली. त्यावर रावते म्हणाले की, रस्त्यांचा दर्जा सुधारतो तसा त्यावर चालणाऱ्या वाहनांचा वेग वाढतो. महामार्गांवरील रस्ते अपघातामध्ये वाहनांचा अतीवेग हे एक प्रमुख कारण ठरत असून हे रोखण्यासाठी परिवहन, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक पोलीस आदींनी एकत्र येऊन समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

अपघाताचे प्रमाण शून्य टक्क्यावर आणायचे

२०१३ च्या तुलनेत मागील वर्षी महाराष्ट्रातील अपघातांची संख्या ही १०.५ टक्क्यांनी कमी झाली आहे. आपल्यासाठी ही काही गौरवाची बाब नाही. आपल्याला अपघातांचे प्रमाण शुन्य टक्क्यांवर आणायचे आहे. यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन रावतेंनी यावेळी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -