घरमुंबईउप्तन्न घटल्यामुळे एसटी मार्ग तपासणी मोहिम व्यापक

उप्तन्न घटल्यामुळे एसटी मार्ग तपासणी मोहिम व्यापक

Subscribe

महामंडळाने विभागीय कार्यालयाला दिले निर्देश मार्ग ,तपासणीसाठी एसटी महामंडळाने १०३ नवीन वाहने

कोट्यवधीच्या तोट्यात असलेल्या एसटीची प्रवासी संख्या दिवसागणिक कमी होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळातर्फे अनेक उपाय राबवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महामंडळाकडून एसटीचे मार्ग तपासणी अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याचा निर्णय घेतला आहे. या तपासणीसाठी एसटी महामंडळाने १०३ नवीन जीप आपल्या ताफ्यात दाखल केल्या आहेत. या गाड्या आता एसटीकडून विभागीय कार्यालयात देखील वितरीत करण्यात आल्या आहेत.

गेल्या काही वर्षांपासून तोट्याच्या उंचाक गाठण्याच्या मार्गावर एसटी महामंडळची वाटचाल सुरु आहे. त्यातच काय तर एसटीचे उत्पन्न गेल्यावर्षीच्या तुुलनेत कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी मार्ग तपासणी, लांब मध्यम पल्ल्याच्या फेर्‍यांमधील घट, मार्गावर चालक वाहक यांची प्रवासी घेणेबाबतची उदासीनता ही प्रमुख कारणे समोर आली आहे. त्यामुळे मार्ग तपासणीची व्याप्ती वाढवण्यात यावी, असे आदेश महामंडळाने राज्यातील सर्व विभागांचा दिले असून महिन्यातून एकदा जॅकपॉट मार्ग तपासणी करण्यात यावी, विभागातील सर्व वाहकांची तपासणी दरमहा व अपहार प्रवृत्त वाहकांची तपासणी महिन्यातून दोन वेळा करण्यात यावी, असे महामंडळाने आपल्या विभागप्रमुखांना आदेश देण्यात आले आहे. यासाठी एसटी महामंडळाने एकूण १०३ नवीन वाहनांची खरेदी सुद्धा करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून मार्ग तपासणी मोहीम सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

- Advertisement -

शिवशाही बसेसची होणार तपास
एसटी विभागातील रात्र वस्तीच्या बसेसची तपासणी महिन्यातून किमान एकादा करण्यात यावी, आगारातील सर्व वाहकांचे तिकीट वारंवार तपासून आगार लेखाकार यांच्याकडून अहवाल मागवण्यात यावा अश्या सूचना भी एसटी महामंडळाने दिल्या आहेत सोबतच शिवशाही आसनी व शयनयान बसेसची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. मार्ग तपासणी पथकांनी दैनंदिन जास्तीत जास्त वाहकांची राज्य परिवहन रक्कम व खाजगी रकमेची तपासणी करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -