घरमहाराष्ट्रयादी जाहीर झाली,बंडखोरी वाढली

यादी जाहीर झाली,बंडखोरी वाढली

Subscribe

बंडाळी थंड करण्यासाठी काँग्रेस-भाजपाची कसरत

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसकडून जसजशा उमेदवारांच्या याद्या घोषित होत आहेत, तसतशी खासदारकीच्या उमेदवारीची आशा धरलेल्यांनी बंड पुकारायला सुरूवात केली आहे. भाजपची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर एकूण 6 खासदारांचा पत्ता कापण्यात आला. यात दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा समावेश आहे. त्यामुळे चव्हाण नाराज असून अपक्ष निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. त्यांच्यापाठोपाठ शिर्डीतील माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी तर अपक्ष लढणार असल्याचे जाहीरही करून टाकले आहे.

शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने श्रीरामपूर येथील आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची आशा असलेले वाकचौरे आता थेट अपक्ष निवडणूक लढणार आहेत.युतीपाठोपाठ आघाडीमध्ये देखील बंडाळी माजली आहे. अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना आता चंद्रपुरातील जागेचा तिढा सोडवायचा कसा? हा प्रश्न निर्माण झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच दिवस शिल्लक असताना काँग्रेस पक्षाने विनायक बांगडे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया आणि विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांच्यात लोकसभेच्या उमेदवारीवरुन वाद होता. शिवाय शिवसेनेने तिकीट नाकारलेले आमदार बाळु धानोरकर काँग्रेसकडून इच्छूक असल्याने उमेदवारीवरुन वाद निर्माण झाला होता. विनायक बांगडेना उमेदवारी जाहीर केली असली तरी दोन गटात विभागलेले काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचे आव्हान विनायक बांगडेसमोर आहे.

- Advertisement -

तर पक्षाने उमेदवारी न दिल्याने सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. ‘मला लोकांमध्ये जाऊन नशीब आजमावयाचे आहे. मी लोकसभा निवडणूक लढवणारच,’ असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केली आहे. मी औरंगाबादमधून उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने मला उमेदवारी दिली नाही. मी काँग्रेसचा राजीनामा आधीच दिलेला आहे. आता काँग्रेस आमदार म्हणून बोलत नाही. मी लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढत देणार आहे,’ अशी घोषणाही अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -