घरमुंबईगव्हर्नमेंट कॉलनीतील कुटुंब असुरक्षिततेच्या छायेखाली

गव्हर्नमेंट कॉलनीतील कुटुंब असुरक्षिततेच्या छायेखाली

Subscribe

सरकारी घर असुरक्षित असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. वांद्रे येथील गव्हर्नमेंट कॉलनीतील स्लॅप कोसळल्याची दुर्वैवी घटना घडली. या घटनेत सावंत कुटुंबातील मुलगा आणि आई जखमी झाले असून त्यांना भाभा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.

मुंबईकरांच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलिसांच्याच घरातील कुटुंब सुरक्षित नसल्याचे दिसून आले होते. वरळी येथील पोलिस वसाहतीत स्लॅप कोसळून एक महिला जखमी झाली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा स्लॅप कोसळून या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. वांद्रे येथील गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये आज पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये स्लॅप कोसळून दुर्घटना घडली आहे. स्लॅप कोसळून सावंत कुंटुंबातील मुलगा नैतिक आणि वैशाली सावंत हे दोघेही जखमी झाले असून यांच्यावर वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

government colony insecure

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -