घरमुंबईकृषीमंत्र्यांच्या बहिणीचे सरकारविरोधात उपोषण

कृषीमंत्र्यांच्या बहिणीचे सरकारविरोधात उपोषण

Subscribe

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना पेन्शन देण्याची मागणी

1 नोव्हेंबर 2005 नंतर शासनाचे 100 टक्के अनुदान प्राप्त झालेल्या शिक्षक -शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी १८ जूनपासून शिक्षक संघर्ष समितीच्यावतीने आझाद मैदान येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांचे नेतृत्त्व कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची बहीण संगीता शिंदे या करत आहेत.

शुक्रवारी विधानसभेत स्थगन प्रस्तावादरम्यान या प्रश्नावर विरोधक आमदारांनी लक्ष्यवेधी मांडली, तर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या वागणुकीसंदर्भात संताप व्यक्त केला. त्यामुळे संगीता शिंदे यांचे नाव चर्चेच्या अग्रभागी आले. जोपर्यंत पेन्शनच्या विषयावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करत राहू असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर केल्याचे विधानसभेत समजल्यावर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आझाद मैदानात जाऊन संगीता शिंदे यांचे म्हणणे ऐकूण घेतले.

- Advertisement -

जे कोणी आंदोलनात येतात, मंत्री येतात, आमदार येतात, ते बोलून जातात की माझे मोठे बंधू कृषीमंत्री झाले, त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे, पण मी या सर्वांना विनंती करते की जे नातं असते, ते घरचे असते, मी हे सर्व समाजासाठी करते आहे आणि तेही समाजासाठी करत आहे. मी शासनाविरोधात आंदोलन करत आहे. ३८५ शिक्षक माझ्यासोबत ४ दिवसांपासून उपाशी राहतात, याची तळमळ या मंत्री आणि आमदारांना नाही, खरोखर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे.
– संगीता शिंदे,अध्यक्ष, शिक्षण संघर्ष समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -