घरमुंबईवांद्रयात भीषण आग; सहा जण जखमी

वांद्रयात भीषण आग; सहा जण जखमी

Subscribe

मुंबईच्या वांद्रे येथील कनाकिया पॅलेसजवळील महाराष्ट्र नगर येथे संध्याकाळी ६ च्या सुमारास भीषण आग लागली. एका घरात ही आग लागली असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. आगीत सहा जण भाजले आहेत.

मुंबईच्या वांद्रे येथील कनाकिया पॅलेसजवळील महाराष्ट्र नगर येथे संध्याकाळी ६ च्या सुमारास भीषण आग लागली. एका घरात ही आग लागली असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. या आगीत सहा जण भाजले असल्याची माहितीही अग्निशमन दलाकडून देण्यात आली असून जखमींवर वांद्रयाच्या भाभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

बुधवारी संध्याकाळी सहा वाजता या आगीची नोंद करण्यात आली. या कुटुंबातील ४५ वर्षीय नगमा बानो या ३५ ते ४० टक्के भाजल्या आहेत. नसरीन बानो, साक्रिन बानो, नाझिया शेख, आलिया शेख, अयान शेख अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या सहा ही जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -