घरमुंबईतर इक्बाल मॅन्शन जळून खाक झाली असती

तर इक्बाल मॅन्शन जळून खाक झाली असती

Subscribe

परेलच्या क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच त्या इमारतीसमोर असलेल्या इक्बाल मेन्शन या इमारतीला सोमवारी सायंकाळी आग लागली. या आगीमुळे इमारतीमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

परेलच्या क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच त्या इमारतीसमोर असलेल्या इक्बाल मेन्शन या इमारतीला सोमवारी सायंकाळी आग लागली. या आगीमुळे इमारतीमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अग्निशमन दलाने वेळीच येऊन आग विझवली नसती तर इक्बाल मेन्शन जाळून खाक झाली असती, अशी भीती या इमारतीमध्ये राहणारे कय्युमभाई यांनी दिली.

२२ ऑगस्टला परेल येथील क्रिस्टल टॉवरला आग लागली होती. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला. यामुळे या विभागात हळहळ व्यक्त केली जात होती. क्रिस्टल टॉवरची दुर्घटना घडल्यावर पाचव्या दिवशी इक्बाल मॅन्शन या इमारतीमधील तळमजल्यावर असलेल्या घड्याळाच्या गोडाऊनला आग लागली. तिथे घड्याळे आणि घड्याळाचे बॉक्स ठेवण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी पावणे चारच्या सुमारास गोडाऊनमध्ये शॉर्टसर्किट झाले आणि आग लागली. घड्याळाचे बॉक्स असल्याने आग गोडाऊनमध्ये पसरली. तेथील कर्मचार्‍यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग आटोक्याबाहेर जात असल्याचे कळताच अग्निशमन दलाला कॉल करण्यात आला, अशी माहिती येथील रहिवाशांनी दिली.

- Advertisement -

घड्याळाच्या गोडाऊनला आग लागल्याचे कळताच इमारत त्वरित खाली करण्यात आली. इमारतीमधील पुरुष कामानिमित्त बाहेर असल्याने घरांमध्ये फक्त महिला, वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुले होती. या सर्वांनी इमारती खाली गर्दी केली होती. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आपल्या जीवाची बाजी लावत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाऊणतास आगीशी झुंज दिली. त्यानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. अग्निशमन दलाने वेळीच येऊन आगीवर नियंत्रण मिळवले नसते गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती. इमारतीमधील ६५ घरांमध्ये राहणारे रहिवाशी व तिसर्‍या मजल्यावर असलेल्या महाराष्ट्र गेस्ट हाऊसमध्ये ही आग पसरली असती, असे येथील रहिवाशांनी सांगितले.

करदात्या नागरिकांच्या जीवाचे रक्षण
आगीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूर होता. आतमध्ये गुदमरायला होत होते. आम्ही १५ ते १६ किलो वजनाचे ऑक्सिजनसचे सिलेंडर पाठीवर घेऊन आगीत शिरलो होतो. इतके वजन घेऊन आगीशी झुंज देणे सोपे काम नाही. करदात्या नागरिकांमुळे आम्हाला पगार मिळतो. करदात्या नागरिकांची मालमत्ता आणि जीवाचे रक्षण करणे आमचे काम असल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -