घरमुंबईचेंबूरच्या टिळकनगरमध्ये पुन्हा आग!

चेंबूरच्या टिळकनगरमध्ये पुन्हा आग!

Subscribe

मुंबईच्या टिळकनगर परिसरात पुन्हा आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मुंबईमध्ये काही केल्या आगीचे सत्र कमी होताना दिसत नाही. दररोज कुठल्यान कुठल्या ठिकाणी आगीची घटना घडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चेंबूरच्या टिळकनगर परिसरात आग लागली होती. आज पुन्हा सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास टिळकनगर येथे आग लागली आहे. ही आग ५० क्रमांकाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असून ही आग पुर्णपणे विझली आहे. या आगीमध्ये सध्यातरी कुठल्याही प्रकारची जिवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -