घरमुंबईमहाविद्यालयच घेणार प्रथम आणि द्वितीय वर्षाची परिक्षा

महाविद्यालयच घेणार प्रथम आणि द्वितीय वर्षाची परिक्षा

Subscribe

परिक्षा आणि उत्तर पत्रिकांच्या गोंधळ नंतर आता मुंबई विद्यापीठाने यावर तोडगा काढला आहे. आता पदवी शिक्षणाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाची परिक्षा विद्यापीठच घेणार आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्षीय पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाला प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयामार्फत घेतल्या जाव्या असा ठराव विद्या परिषदेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करताना विद्यार्थी आणि सर्व संबंधित घटकांना पुरेसा कालावधी मिळावा यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून करण्यात यावी असेही या बैठकीत ठरविण्यात आले. ही सर्व प्रक्रिया सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून अध्ययन-अध्यापन पद्धतीचा आणि परीक्षांचा दर्जा उंचाविण्यासाठी प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली चारही विद्याशाखेतील अधिष्ठाता मिळून समितीचे गठण करणार आहेत. या समितीच्यामार्फत नियमावली तयार केली जाणार आहे. महाविद्यालयांमार्फत घेतल्या जाणाऱ्या या दोन्ही वर्षाच्या परीक्षा आणि अध्ययन- अध्यापन यांचा दर्जा टिकवून सुरळीत पद्धतीने पार पडावे यासाठी मार्गदर्शक सूचनाही निर्गमित केल्या जाव्यात असेही सर्वानुमते विद्या परिषदेत ठरविण्यात आले.

महाविद्यालयांच्या प्रतिनिधींकडून जुन्या पद्धतीची मागणी

मागील दोन वर्षांपासून मुंबई विद्यापीठाच्या पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षांचे नियोजन हे विद्यापीठामार्फत केले जात होते. परिक्षा वेळापत्रक आणि प्रश्नपत्रिका विद्यापीठामार्फत निश्चित केली जात होती. परंतु, विद्यापीठामार्फत करण्यात येणाऱ्या परीक्षांच्या नियोजनामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील काही महाविद्यालये तसेच रात्र महाविद्यालयांची गैरसोय व्हायची. अनेक महाविद्यालयांना कनिष्ठ महाविद्यालये जोडून असल्यामुळे गोंधळ झाला. याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या लांबलेल्या वेळापत्रकामुळे शैक्षणिक सत्राची अपूर्णता, विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या परीक्षांच्या मुल्यांकनाला गती मिळावी आणि परीक्षांच्या कामासाठी महाविद्यालयातील मनूष्यबळ उपलबद्ध व्हावे यासाठी महाविद्यालयांच्या प्रतिनिधींनी जुन्याच पद्धतीने प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयामार्फत घेतल्या जाव्या अशी मागणी विद्यापीठाकडे केली.

- Advertisement -

विद्यापीठाने अखेर निर्णय घेतला

महाविद्यालयाच्या प्रतिनिधींच्या मागणीचा विचार करुन विद्यापीठाने या सर्व बाबींची तपासणी केली. त्यानंतर उद्भवणाऱ्या समस्यांचे निरसन करण्यासाठी व उच्च शिक्षणात विद्यापीठाच्या परीक्षांचा दर्जा कायम राखून, अध्ययन-अध्यापन पद्धतीमध्ये सुसत्रता आणण्यासाठी विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या अध्यक्षेखाली समितीचे गठण केले. समितीने या परीक्षांचे वेळापत्रक, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपुस्तिकांचे मुल्यांकन या आनुषांगिक बाबींच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने सलंग्नित महाविद्यालयांचे अभिप्राय आणि सूचना मागविल्या होत्या. विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये सुसूत्रता यावी, त्याचे कालबद्ध नियोजन व्हावे या अनुषंगाने समितीने शिफारशी केल्या होत्या. या शिफारशींच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या विद्या परिषदेने सविस्तर चर्चा करुन सर्वानुमते प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा या महाविद्यालयामार्फत घेतल्या जाव्या असा ठराव मंजूर झाला. मात्र या सर्व प्रक्रियेवर योग्य ती देखरेख आणि सुसुत्रता आणण्यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी योग्य त्या पद्धतीने करण्यासाठी प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली चारही अधिष्ठाता यांच्या समितीचे गठण केले जाणार आहे.

या समितीच्या माध्यमातून प्रामुख्याने महाविद्यालयामार्फत संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जातो किंवा नाही, अध्ययन-अध्यापनाचा १८० दिवसांचा कार्यकाळ पाळला जातो का आणि कसा , प्रत्येक महाविद्यालयामार्फत तयार करण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकांचा दर्जा कायम राखण्यासाठी विद्यापीठ स्तरावरुन त्या प्रश्नपत्रिकांची छाननी केली जावी, महाविद्यालयाच्या स्तरावर पेपर सेटींग समितीचे गठण केले जावे, आवश्यकता भासल्यास त्या-त्या क्षेत्रातील महाविद्यालयांचे समुह महाविद्यालये तयार करुन पेपर सेटींग, मुल्यांकन, परीक्षांच्या वेळापत्रकांमध्ये समानता आणली जावी, आणि उत्तरपुस्तिकांच्या मुल्यांकनाचा दर्जा कायम राखून त्यावर निरीक्षण ठेवण्यासाठी तशी यंत्रणा राबविण्यात यावी या आनुषांगिक बाबी समितीच्या मार्फत राबविल्या जाणार असून त्यादृष्टिकोतून मार्गदर्शक नियमावली तयार केली जाणार आहे. काल झालेल्या विद्या परिषदेच्या या निर्णयाचे महाविद्यालयामार्फत व शैक्षणिक वर्तूळातून स्वागत केले जात आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -