घरमुंबईपोलिसांवर हल्ला करणार्‍या पाच जणांना पोलीस कोठडी

पोलिसांवर हल्ला करणार्‍या पाच जणांना पोलीस कोठडी

Subscribe

दोन महिला फरार

राज्य विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून या निवडणुकीत मतदानासाठी अवैध दारूचा बेकायदा वापर होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. सोमवारी सायंकाळी तालुका पोलीस ठाण्याचे पथक जुनादुर्खी येथील एका दारू अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका कुटूंबाने त्यांना विरोध व शिवीगाळ करून धक्काबुक्की करीत अडथळा निर्माण केल्याची घटना घडली. याविरोधात तालुका पोलीस ठाण्यात दोन महिलांसह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या अटकेतील पाच जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर घटनेनंतर फरार झालेल्या दोन महिलांचा पोलीस शोध घेत आहेत.

श्याम बबन म्हात्रे (49), तन्मय श्याम म्हात्रे (19), तुषार श्याम म्हात्रे (23), हेमंत दिपक म्हात्रे (23) व श्रीराम बबन म्हात्रे (47) असे पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याने अटक केलेल्या इसमांची नावे आहेत. तर जयवंती प्रभाकर म्हात्रे व कामिनी श्याम म्हात्रे या दोन महिला फरार झाल्या असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या घटनेचे अधिक वृत्त असे कि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावठी दारूच्या अड्ड्यांवर पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. त्यामुळे जुनादुर्खी येथे गावठी दारूची विक्री केली जात असल्याची खबर पोलीस उपनिरीक्षक वैभव देशपांडे यांना मिळाल्याने त्यांनी पोलीस पथकाला सोबत घेऊन दारू अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी रवाना झाले होते.

- Advertisement -

दारू अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी जात असताना जयवंती म्हात्रे या महिलेने या पोलीस पथकाला रोखून धरले. तर या महिलेच्या कुटूंबियांनी पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून कारवाईत अडथळा निर्माण केला. त्यामुळे पोलिसांनी आणखीन पोलीस कुमक मागवून या कुटूंबातील पाच जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. या पाचही जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दोन महिला फरार झाल्याने त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन दाभाडे करीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -