घरमुंबई80 जागांवरही शिवसेनेने युती केली असती

80 जागांवरही शिवसेनेने युती केली असती

Subscribe

 मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांची शिवसेनेवर टीका

युतीसाठी शिवसेना 144 जागांवर अडून बसली होती. परंतु, भाजपने 124 ऐवजी 80 जागा दिल्या असत्या तरी शिवसेना युतीसाठी तयार झाली असती अशी घणाघाती टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दसर्‍याच्या दिवशी शिवसेनेवर केली. शिवसेनेच्या अनेक गोष्टी भाजपला माहित होत्या. त्यामुळे शिवसेना दबावाखाली होती असेही ते म्हणाले.

घाटकोपर पूर्व येथील काँग्रेस उमेदवार मनीषा सूर्यवंशी यांच्या प्रचार कार्यालयाचे दसर्‍याच्या मुहूर्तावर एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेना ही भाजपला सोडून जाऊ शकत नाही. शिवसेनेच्या काही गोष्टी भाजपला माहीत असल्याने ते दबावाखाली होते. या दबावामुळे भाजपने त्यांना 124 नव्हे तर 80 जागा दिल्या असत्या तरी ते युती करण्यास तयार झाले असते अशी खरमरीत टीका त्यांनी शिवसेनेवर केली. त्याचबरोबर त्यांनी आम्हाला देशात लोकशाही टिकवण्याबरोबरच देशाचा विकास करायचा आहे. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य समविचारी पक्ष एकत्र आलो आहोत. आमच्या शपथनाम्यात जी आश्वासने दिली आहेत, त्यांना आम्ही बांधील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. उर्मिला मातोंडकर, संजय निरुपम, मिलिंद देवरा, प्रिया दत्त हे सर्व आमचेच आहेत. त्यांना एकत्र घेऊन आम्ही निवडणूक लढवणार असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -