घरमुंबई'पश्चिम रेल्वे'वर ३ वर्षांत ४ हजार सिग्नल बिघाड

‘पश्चिम रेल्वे’वर ३ वर्षांत ४ हजार सिग्नल बिघाड

Subscribe

पश्चिम रेल्वेवर तीन वर्षांत ४ हजार ५०४ सिग्नल बिघाड झाल्याची माहिती समोर आली असून गेल्या आर्थिक वर्षांत २०१७-१८ दररोज सरासरी तीन सिग्नल बिघाड झाल्याची धक्कादायक माहिती आरटीआयतून उघडकीस आली आहे.

उपनगरीय प्रवाशांसाठी नेहमीच काही कल्पक उपाय योजनात पुढे असलेली पश्चिम रेल्वे सिग्नल बिघाडांच्या बाबतीत ही कमी नसल्याचे समोर आले आहे. पश्चिम रेल्वेवर तीन वर्षांत ४ हजार ५०४ सिग्नल बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. तर गेल्या आर्थिक वर्षांत (२०१७-१८) दररोज सरासरी तीन सिग्नल बिघाड झाल्याची धक्कादायक माहिती आरटीआयतून उघडकीस आली आहे.

रेल्वेने माहितीच्या अधिकातून दिली माहिती

आरटीआय कार्यकर्ते समीर झवेरी यांनी पश्चिम रेल्वेकडे जानेवारी २०१६ ते सप्टेंबर २०१९ दरम्यान पश्चिम रेल्वेवर किती सिग्नल बिघाड, इंजिन बिघाड आणि रुळाला तडे झाले आहेत, याची माहिती मागितली होती. या मिळालेल्या माहितीच्या आधारे १ जानेवारी २०१६ पासूनची माहिती रेल्वेने झवेरी यांना माहितीच्या अधिकारात दिली आहे. या माहिती अधिकारातून ‘पश्चिम रेल्वे’वर तीन वर्षांत ४ हजार ५०४ बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम रेल्वेवर २०१६ – १७ या आर्थिक वर्षात तब्बल १ हजार ५४१ सिग्नल बिघाड झाल्याने ट्रेनची वाहतूक विस्कळीत होऊन प्रवाशांना मोठा फटका बसल्याचे झवेरी यांनी म्हटले आह. तर २०१७ – १८ या आर्थिक वर्षात १ हजार ६३ सिग्नल बिघाड झाल्याचे उघडकीस आले आहे. तर १ एप्रिल २०१९ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत ५९२ सिग्नल बिघाडाच्या घटना घडल्या आहेत. तसेच सिग्नल बिघाडाचा आलेख पाहता २०१८ – १९ या आर्थिक वर्षात १ हजार ६३ सिग्नल बिघाड घडल्याने दररोज सरासरी तीन सिग्नल बिघाड घडल्याने ट्रेनचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून १ एप्रिल २०१९ ते ३० सप्टेंबर २०१९ या नऊ महिन्यांतच ५९२ सिग्नल बिघाड झाले असल्याचे उघडकीस आले आहे.

- Advertisement -

८११ इंजिनांत बिघाड

२०१६ – १७ या आर्थिक वर्षात पश्चिन रेल्वेवर एकूण ५१२ इंजिन बिघाड झाले असून २०१७ – १८ या आर्थिक वर्षात ८११ इंजिनांमध्ये बिघाड झाल्याने मेल – एक्स्प्रेसच्या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.


हेही वाचा – अनुष्काने असा सेलिब्रेट केला पती विराटचा वाढदिवस; शेअर केली पोस्ट


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -