घरCORONA UPDATEBMC च्या वतीने उद्यापासून २४४ ठिकाणी 'कोविड'ची मोफत वैद्यकीय चाचणी

BMC च्या वतीने उद्यापासून २४४ ठिकाणी ‘कोविड’ची मोफत वैद्यकीय चाचणी

Subscribe

कोविड-१९ विषयक वैद्यकीय चाचण्या करण्यावर देखील बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने भर देत आहे. याच अंतर्गत उद्यापासून म्हणजेच २ नोव्हेंबर २०२० पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील विविध दवाखाने, रुग्णालये इत्यादी प्रकारच्या एकूण २४४ ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधेमुळे मुंबईत कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करण्याची सुविधा ३०० पेक्षा अधिक ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

मुंबईत संभाव्य कोविड संसर्गावर अधिकाधिक प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य व्हावे, यासाठी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरीय उपाययोजना करीत आहे. याच उपाययोजनांचा भाग म्हणूनसर्व २४ विभागांमध्ये २४४ ठिकाणी कोविड विषयक वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या २४४ ठिकाणांच्या पत्त्यांची यादी विभागनिहाय नियंत्रण कक्षांद्वारे आणि महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या ‘१९१६’ या क्रमांकाद्वारेही उपलब्ध करून देण्यात येत आहे. याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे http://stopcoronavirus.mcgm.gov.in या स्वतंत्रपणे सुरू करण्यात आलेल्या समर्पित संकेतस्थळावर देखील ही माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे संभाव्य रुग्ण महापालिकेच्या ज्या विभागात रहात असेल, त्याच्या घराजवळ असणाऱ्या ठिकाणांची माहिती, ही विभागीय नियंत्रण कक्षांच्या दूरध्वनी क्रमांकांवर किंवा ‘१९१६’ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर उपलब्ध होणार आहे. तसेच यासाठी संकेतस्थळाचा पर्याय देखील उपलब्ध आहे.यामुळे मुंबईकरांना आपल्या घरालगतच्या परिसरात कोविड विषयक वैद्यकीय चाचणी आता अधिक सुलभतेने व मोफत करवून घेता येणे शक्य होणार आहे.

- Advertisement -

कोविड विषयक वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध असणाऱ्या ठिकाणांची एकूण संख्या ही ३०० पेक्षा अधिक झाली असून मुंबईकरांना कोविड विषयक वैद्यकीय चाचण्या करण्याचे अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. ज्यामुळे चाचण्यांची संख्या वाढण्यास मदत होण्यासोबतच वेळेत निदान होण्यासही मदत होणार आहे. परिणामी अधिक प्रभावीपणे कोविड संसर्गाला प्रतिबंध करणेही शक्य होणार आहे, अशी माहिती या निमित्ताने अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

सध्या चाचणीसाठी हे आकारले जातात दर

२४४ ठिकाणांव्यतिरिक्त व्यतिरिक्त, महापालिका क्षेत्रातील ५४ खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्येही या आधीपासूनच कोविड विषयक वैद्यकीय चाचणी सुविधा सशुल्क स्वरूपात उपलब्ध आहे. यासाठी सुधारित शासकीय दरांनुसार घरी येऊन वैद्यकीय चाचणी करण्यासाठी रुपये १,८००; तर वैद्यकीय प्रयोगशाळेत जाऊन चाचणी करवून घेण्यासाठी रुपये १,४०० एवढे शुल्क आहे.

- Advertisement -

या वेळात होणार चाचणी

सध्या सुरुवातीला दररोज सकाळी १० ते १२ या कालावधीदरम्यान सदर २४४ ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचणी सुविधा ‘वॉक इन’ पद्धतीने उपलब्ध असणार आहे. यापैकी काही ठिकाणी आरटीपीसीआर पद्धतीची वैद्यकीय चाचणी; तर उर्वरित ठिकाणी अॅंटीजन (Antigen) आधारित वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा –

ट्रम्पला टक्कर देणाऱ्या बिडेनच्या मुलाने Porn Site वर उडवले तब्बल १५ लाख रुपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -