घरमुंबईसावरकरांचा सन्मानाचा अवमान होतो तेव्हा...

सावरकरांचा सन्मानाचा अवमान होतो तेव्हा…

Subscribe

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीचे निमित्त करत सरकारला अडचणीत आणू पाहणार्‍या भाजपचे सगळेच नेते बुधवारी विधानसभेत तोंडघशी पडले. अतिघाई भाजप नेत्यांच्या अडचणी वाढवत असल्याचा हा आणखी एक अनुभव त्या पक्षाला सुरू असलेल्या अधिवेशनाच्या दुसर्‍याच दिवशी आला. वि.दा. सावकरांच्या सन्मानासाठी ताकद लावता लावता भाजप पुरता घसरलेल्या अवस्थेत काल विधानसभेत अडचणीत आला. अखेर निमित्त काढत त्या पक्षाच्या आमदारांनी सभात्याग करून स्वत:ची सुटका करून घेतल्याची चर्चा विधानभवनात दिवसभर होती.

सोमवारपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भाजपने आक्रमकपणा दाखवण्याचा प्रयत्न केला. सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करताना भाजपने उसनेे अवसान आणल्याचे पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच शेतकर्‍यांना कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. तरीही कर्जमाफीचे आणि उध्दव ठाकरे यांच्या सातबारा कोरा करण्याच्या घोषणेचे निमित्त करत भाजपने सभागृहात गोंधळ घालत विधानभवनाच्या पायर्‍यांचा आसरा घेतला. पुन्हा मंगळवारी कर्जमाफीचे निमित्त करत आणि राज्यभर सरकारविरोधी आंदोलन पुकारत स्थगन प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न भाजपने केला. तो फेटाळण्यात आल्याने पुन्हा भाजप आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसकण घातली.

- Advertisement -

दुसरा दिवस असा वाया गेला असताना तिसर्‍या दिवस वाया घालवण्याचा आराखडाच जणू भाजपच्या नेत्यांनी रचला होता. यासाठी अर्थातच वि.दा.सावरकर यांच्या पुण्यतिथीचे निमित्त करण्यात आले. बुधवारी काय करणार याची माहिती भाजपचे नेते आणि आमदार पत्रकारांना देत होते. झालेही तसेच. सावकरांच्या गौरवाचा प्रस्ताव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी इतक्या जोरकसपणे मांडला की यामुळे सत्ताधारी विशेषत: शिवसेना अडचणीत येईल, असे चित्र होते. प्रत्यक्षात सेनेपेक्षा भाजपच अडचणीत आला आणि फरफटत सभागृह सोडण्याचा निर्णय नेत्यांना घ्यावा लागला.

सावरकरांचा गौरव करण्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची आपली मागणी केंद्राने अद्याप का स्वीकारली नाही, अशी विचारणा सेनेचे मंत्री अनिल परब यांनी फडणवीस यांच्याकडे केली. ते जाहीर करून घ्या मग सरकार तुमच्या आणि पंतप्रधान मोदींचे कौतुकाचा प्रस्ताव आणेल, असे सांगताच भाजपची एकच कोंडी झाली. एव्हाना आक्रमकपणा दाखवणार्‍या भाजप नेत्यांच्या शिडातील हवाच निघून गेल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -