घरमुंबईGood News: मुंबईत यंदा अकरावीच्या प्रवेशाची चिंता नाही

Good News: मुंबईत यंदा अकरावीच्या प्रवेशाची चिंता नाही

Subscribe

मुंबई विभागात यंदा नवी 35 कॉलेज

ऑनलाईन अकरावी परीक्षेसाठी मुंबई उपसंचालक विभागाकडून सुरू असलेली नोंदणीप्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली. 25 एप्रिलपासून सुरू असलेल्या या नोंदणीप्रक्रियेमध्ये तब्बल 849 कॉलेजांनी नोंदणी केली असून, यामध्ये तब्बल 35 नव्या कॉलेजांचा समावेश आहे. त्यामुळे यावर्षी प्रवेशासाठी अधिक जागा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.दहावीचे निकाल लागल्यानंतर अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, अंबरनाथ नगरपालिका तसेच पनवेलमधील ज्युनियर कॉलेजच्या प्रशासनांना 15 मेपर्यंत नोंदणी शिबिर भरवण्यात आले होते. नोंदणी शिबिराला सुरुवातील अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी शेवटच्या पाच दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात आली.

मुंबई महानगर प्रादेशिक विभागामध्ये झालेल्या या नोंदणीमध्ये 25 मेपर्यंत तब्बल 849 कॉलेजांनी मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे नोंद केली. नोंदणी करण्यात आलेल्या कॉलेजांमध्ये गतवर्षी 814 कॉलेज असून, यावर्षी 35 नव्या कॉलेजांनी नोंदणी केली. त्यामुळे यावर्षी मुंबई महानगर विभागामध्ये मोठ्या प्रमाणात जागा निर्माण होणार आहेत. सीबीएसई व आयसीएसईच्या निकालामध्ये 90 टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी चुरस निर्माण झाली होती. परंतु नव्याने नोंदणी झालेल्या 35 कॉलेजांमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

२५ मे पासून सुरू होणार प्रवेश प्रक्रिया

अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया यंदा २५ मेपासून सुरू होत आहेत. कॉलेजची नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्याने विभागातील शाळास्तरांवर माहितीपुस्तिका पाठवण्यात आल्या आहेत. प्रवेशासंदर्भातील माहिती पुस्तिका 25 मेपासून शाळांमध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केंद्रांशी संपर्क साधून प्रवेशासाठी नोंदणी करावी असे आवाहन मुबई उपसंचालक विभागाचे सहाय्यक संचालक भास्कर बाबर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -