घरमुंबईइमारतीच्या काचा पुसणाऱ्या कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर

इमारतीच्या काचा पुसणाऱ्या कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर

Subscribe

प्रभादेवी परिसरामधील सिनर्जी इमारतीची काच साफ करणाऱ्या ट्रॉलीची वायर तुटल्याची घटना आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. इमारतीची काच साफ करण्यासाठी दोन कामगार या ट्रॉलीमध्ये उभे होते. मात्र अचानक डाव्या बाजूच्या ट्रॉलीची वायर तुटल्याने ही ट्रॉली एका बाजूला झुकूल्याने लटकत होती. या ट्रॉलीमध्ये दोन कामगार होते. या कामगारांना खाली उतरवण्यासाठी सेंच्युरी येथील अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाल्यानंतर अखेर अर्ध्या तासाच्या प्रतिक्षेनंतर दोन कामगारांची सुखरुप सुटका झाली.

नेमके काय घडले?

प्रभादेवी येथील आप्पासाहेब मराठे मार्गावर सिनर्जी इमारत आहे. ही इमारत पूर्णपणे काचेची असल्याने या इमारतीच्या दररोज काचा पुसण्यात येतात. आज देखील काचा पुसण्यासाठी कामगार ट्रॉलीमधून गेले. मात्र आज सकाळी अचानक ट्रॉलीची वायर तुटली आणि कामगार एका बाजूला झुकले गेले. अखेर घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाल्यानंतर या दोन कामगारांची सुटका करण्यास अग्निशमन दलाला यश आले.

- Advertisement -

कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर

ट्रॉलीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून आले. या कामगारांनी काम करताना सेफ्टी बेल्ट लावले नव्हते तर ट्रॉलीमध्ये काम करणारे कामगार आणि ट्रॉली कॅन्टोल करणाऱ्या व्यक्तींमध्ये वॉकी टॉकी नसल्याने त्यांच्यात संभाषण होऊ शकलेले नाही. अखेर कामगारांनी आरडाओरड केल्यानंतर ट्रॉलीची वायर तुटल्याचे निदर्शनास आले आणि या दोन कामगारांना सुरक्षित खाली उतरवण्यात आले.

टोलेजंग इमातीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

चार दिवसांपूर्वीच प्रभादेवी येथील ब्यू माँडच्या एका ३३ मजली इमारतीला आग लागली होती. टोलेजंग इमारत असल्याने आग विझवण्याकरता अग्निशमन दलाला शयर्तीचे प्रयत्न करावे लागले आणि अखरे अंदाजे ४-५ तासाने आग विझवण्यात यश आले. मात्र सिनर्जी इमारतीमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर टोलेजंग इमारतींच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -