घरमुंबई'त्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी द्या'

‘त्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी द्या’

Subscribe

हिमालय पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा निरपराधांचा बळी गेला. त्यांच्या परिवारातील एकास शासकीय नोकरी सांत्वनपर मदत म्हणून सरकारने द्यावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. 

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस स्थानकाला लागून असलेला हिमालय पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा निरपराधांचा बळी गेला. तसेच ३४ जण जखमी झाले. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असून त्यांच्या परिवारातील एकास शासकीय नोकरी सांत्वनपर मदत म्हणून सरकारने द्यावी, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रयत्न करणार असल्याचे सांगत मुंबईत पुल कोसळण्याच्या वारंवार होणाऱ्या दुर्घटनांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

जबाबदार अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा करा

हिमालय पुल दुर्घटनास्थळी भेट देऊन त्यांनी पाहाणी केली, तसेच सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींच्या प्रकृतीची आठवले यांनी अस्थेवायिकपणे चौकशी केली. रामदास आठवलेंनी हिमालय पुल दुर्घटनास्थळी भेट दिली त्यावेळी पोलीस, रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. हिमालय पुल हा १९८४ साली बांधण्यात आलेला पुल होता. रेल्वे आणि महापालिकेच्या हद्दीतील पुल होता. त्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाने स्विकारली आहे. हा पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे. तसेच यांसारख्या अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्यातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी रामदास आठवले यावेळी प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -