घरदेश-विदेशजम्मू काश्मीरमध्ये भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, ३ जण जखमी

जम्मू काश्मीरमध्ये भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, ३ जण जखमी

Subscribe

जम्मू काश्मीरच्या रामबन भागात भीषण अपघात झाला असून या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

जम्मू काश्मीरच्या रामबन भागात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे वाहन चंदरकोटहून राजगढकडे जात असताना हा भीषण अपघात झाला आहे. या गाडीवरच्या चालकाचा ताबा सुटल्यामुळे ही गाडी पाचशे फूट खोल दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास गाडी चंदरकोटहून राजगढकडे जात होती. ही गाडी रामबन या ठिकाणी पोहोचली असता त्या प्रवासा दरम्यान चालकाचा गाडीवरचा ताबा सुटून ही गाडी खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करण्यास सुरुवात केली. मात्र या अपघातामध्ये ११ जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश असल्याची माहिती समोर आली असून जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -