घरमुंबईHC Order: सासू-सासऱ्यांच्या मानसिक शांतीसाठी सुनेला बेघर करता येणार नाही - मुंबई...

HC Order: सासू-सासऱ्यांच्या मानसिक शांतीसाठी सुनेला बेघर करता येणार नाही – मुंबई उच्च न्यायालय

Subscribe

मुंबई उच्च न्यायालयाने एका केस संदर्भात निकाल देताना आदेश दिले आहेत की, एखाद्या महिलेला तिच्या विवाहित घरातून बाहेर काढले जाऊ शकत नाही

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने एका केस संदर्भात निकाल देताना आदेश दिले आहेत की, एखाद्या महिलेला तिच्या विवाहित घरातून बाहेर काढले जाऊ शकत नाही किंवा केवळ तिच्या वृद्ध सासू-सासऱ्यांची मानसिक शांती राखण्यासाठी तिला बेघर केले जाऊ शकत नाही. न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती, ज्यात पालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल आणि कल्याण कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या मेंटेनन्स ट्रिब्युनलने दिलेल्या आदेशाला आव्हान दिले होते. (HC Order Daughter in law cannot be made homeless for mental peace of mother in law Bombay High Court)

महिलेने तिच्या याचिकेत आरोप केला होता की, तिच्या पतीकडून आई-वडिलांच्या संगनमताने तिला घराबाहेर काढण्यासाठी मेंटेनन्स ट्रिब्युनलचा गैरवापर केला जात आहे. पीठाने स्पष्ट केले की ज्येष्ठ नागरिकांना मनःशांतीने जगण्याचा अधिकार आहे, परंतु घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत महिलांच्या हक्कांचे उल्लंघन होईल, अशा पद्धतीने ते त्यांचे अधिकार वापरू शकत नाहीत.

- Advertisement -

या प्रकरणावर प्रकाश टाकताना न्यायालयाने म्हटले की, ‘सून आणि तिचा पती यांच्यातील वैवाहिक कलहामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरात शांततेने राहण्याचा अधिकार आहे यात शंका नाही. परंतु त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत असलेली यंत्रणा घरगुती हिंसाचार कायद्याच्या कलम 17 अंतर्गत महिलेच्या हक्कांवर गदा आणण्याच्या उद्देशाने वापरली जाऊ शकत नाही.

नेमकं प्रकरण काय?

याचिकाकर्त्या आणि तिच्या पतीने 1997 मध्ये लग्न केले होते आणि ते सासूच्या नावावर असलेल्या घरात राहत होते. पती-पत्नीमधील काही वैवाहिक मतभेदांदरम्यान, देखभाल न्यायाधिकरणाने 2023 मध्ये या जोडप्याला फ्लॅट रिकामा करण्याचे निर्देश दिले. मात्र, याचिकाकर्त्याच्या पतीने घर सोडले नाही आणि मेंटेनन्स ट्रिब्युनलच्या आदेशालाही आव्हान दिले नाही. तो त्याच्या आई-वडिलांसोबत राहत होता. यावरून कोर्टाला खात्री पटली की महिलेच्या सासरच्या लोकांनी सुरू केलेली बेदखल कारवाई ही केवळ सुनेला घरातून हाकलून देण्याचा डाव होता.

- Advertisement -

कोर्ट म्हणाले, ‘या महिलेला राहण्यासाठी दुसरी जागा नाही. त्यामुळे सासू- सासऱ्यांच्या मानसिक शांततेसाठी सुनेला बेघर करता येणार नाही. उच्च न्यायालयाने न्यायाधिकरणाचा बेदखल आदेशही फेटाळला.

(हेही वाचा: Dombivali Fire : डोंबिवलीमधील देशमुख होम्स परिसरात भीषण आग, 30-40 गोडाऊन जळून खाक)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -