घरताज्या घडामोडीMumbai Rain : मुंबईत पावसाची संततधार, 49 ठिकाणी झाडांची पडझड

Mumbai Rain : मुंबईत पावसाची संततधार, 49 ठिकाणी झाडांची पडझड

Subscribe

मुंबईत गेल्या शनिवारी जोरदार बरसावत दहशत निर्माण केलेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासून ते शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत काही ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात संततधार बरसावत वातावरणात गारवा निर्माण केला. मात्र संततधार पावसामुळे मुंबईकर काहीसे धास्तावले होते.

शुक्रवारी सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत शहर 32.63 मिमी, पूर्व उपनगर 61.91 मिमी तर पश्चिम उपनगर 69.16 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. शहर भागापेक्षाही उपनगरात जास्त प्रमाणात पाऊस पडला. मरोळ येथे सर्वाधिक 101 मिमी, अंधेरी/ पूर्व आणि घाटकोपर 82 मिमी, दिंडोशी 81 मिमी, विक्रोळी 79 मिमी, कुर्ला 69 मिमी तर शहर भागात किमान 47 ते 56 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मात्र संततधार पावसाचा रेल्वे व रस्ते वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला. सुदैवाने दखल घेण्याइतपत कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. त्यामुळे जिवीत हानी होण्याचा सवालच निर्माण झाला नाही. मात्र आगामी 24 तासांत मुंबई शहर व उपनगरे येथील काही ठिकाणी मध्यम, जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

- Advertisement -

49 ठिकाणी झाडे/ फांद्यांची पडझड ; बेस्टची वाहतूक विस्कळीत

मुंबईत रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने शुक्रवारी दिवसभर अगदी सायंकाळी 7 वाजेपर्यंत संततधार सुरू ठेवली. या पावसातच शहर भागात 9 ठिकाणी, पूर्व उपनगरे येथे 11 ठिकाणी तर पश्चिम उपनगरे येथे 29 ठिकाणी असे एकूण 49 ठिकाणी झाडे/ फांद्या यांची पडझड झाली. वीर नरीमन मार्ग, आदर्श नगर येथे झाड पडल्याने दुपारी 3.30 वाजल्यापासून बेस्ट उपक्रमाच्या बस मार्ग क्रमांक 128, 126 ,सी-54, 169 या बसगाड्या हर्डीकर मार्गाने परावर्तीत करण्यात आल्याने या मार्गावरील बेस्ट बस वाहतूक काहीशी विस्कळीत झाल्याचे समजते.

हेही वाचा : Mumbai Rain: मुंबईत पावसाचा हाहाकार, रेल्वेसह रस्ते वाहतूक विस्कळीत, नागरिक बेहाल

- Advertisement -

घर/ भिंती यांची पडझड / शॉर्टसर्किट घटना

मुंबईत दिवसभरात पावसाची संततधार कोसळत असताना शहर भागात 3 ठिकाणी तर पूर्व उपनगर भागात 2 ठिकाणी अशा एकूण पाच ठिकाणी घरे/ भिंती यांच्या पडझडीच्या घटना घडल्या. तसेच, शहर भागात 2 ठिकाणी, पूर्व उपनगरे भागात 3 ठिकाणी तर पश्चिम उपनगरे भागात 1अशा एकूण 6 ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या आहेत. मात्र सुदैवाने सदर दुर्घटनांत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.


हेही वाचा : Maharashtra monsoon update : पुढील 5 दिवस राज्यात धो-धो पाऊस, ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -