घरमुंबईमुंबईला पावसाने झोडपले; २४ तासात अतिवृष्टीचा इशारा

मुंबईला पावसाने झोडपले; २४ तासात अतिवृष्टीचा इशारा

Subscribe

मुंबईत सलग पडणाऱ्या पावसामुळे जागोजागी पूर परिस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसाने मुंबईकरांची चांगलीच दैना झाली. येत्या २४ तासांत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

सलग दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसाने मुंबईला अक्षरशः झोडपून काढले. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकूण १३ ठिकाणी घराच्या भिंती पडल्या तर कुर्ल्यात एका तीन मजली इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळला. सुदैवाने या घटनांमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. दुपारी अडीच वाजेपर्यंत कुलाबा ११२ मिमी तर सांताक्रूझ वेधशाळेत ३७.२ मिमी पावसाची नोंद झाली. येत्या २४ तासांत मुंबई उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईत शनिवापासूनच संततधार पडणाऱ्या पावसाने आजही जोरदार हजेरी लावली. रविवारी मेगाब्लॉक त्यातच पावसाचा जोर कायम राहिल्याने कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले.

heavy rain in mumbai
मुंबईला पावसाने झोडपले

पालिका अधिकारी सज्ज

मुंबईत दुपारी ३ वाजेपर्यंत पालिका मुख्यालय येथे १८७ मिमी, कुलाबा १६७ मिमी, फॉसबेरी मार्ग शिवडी १५८ मिमी, कुर्ला १३७ मिमी, घाटकोपर १३२, मिमी, मरोळ १६१ मिमी, वर्सोवा १३१ मिमी तर बीकेसी येथे १२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर पालिकेची सर्व यंत्रणा कार्यान्वित झाली असून सर्व विभागीय अधिकाऱ्यांना आपापल्या विभागात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले असल्याचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सांगितले.

heavy rain in mumbai
मुंबईत पूर परिस्थिती

पावसातील ठळक घडामोडी

  • हिंदमाता, परळ टीटी, गांधी मार्केट, मुख्याध्यापक भवन, सायन, सायन रोड क्रमांक २४, परळ, हेमंत मांजरेकर मार्ग, सेक्टर क्रमांक – ६, अँटॉप हिल, शेल कॉलनी चेंबूर, पोस्टल कॉलनी बैल बाजार, काळे रोड, कुर्ला, शीतल सिनेमा, एलबीएस मार्ग, सिद्धार्थ नगर, गोरेगाव, नॅशनल वांद्रे, मिलन सबवे, कपाडिया नगर, बीकेसी आदी ठिकाणी पाणी साचले. पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली
  • शहर तसेच उपनगरात मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी १११ ठिकाणी पंप लावण्यात आले होते. यातील १८ पंप वापरून पाण्याचा निचरा करण्यात आला.
  • शहर व उपनगरांत १३ ठिकाणी घरं, घराच्या भिंती पडल्या, यात कोणीही जखमी नाही
  • पोईसर येथे ४ मजली इमारत खचली, इमारतीतून रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -