घरमुंबईमुंबईसह उपनगरात मुसळधार; नालासोपारा स्टेशन जलमय

मुंबईसह उपनगरात मुसळधार; नालासोपारा स्टेशन जलमय

Subscribe

मुंबईसह उपनगरात मोठ्या प्रमाणात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे नालासोपारा स्टेशन परिसर जलमय झाला आहे.

रविवारपासून मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. अंधेरी, गोरेगाव, दहिसर, डोंबिवली,कल्याण, मुलुंड, माटुंगा, सायन, दादर, परळ भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. तसेच मुंबईत पाणी साचल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे १५ ते २० मिनिटे तर हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक २० मिनिटे उशीराने धावत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रचंड हाल होत आहेत.  त्याचप्रमाणे २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

नालासोपारा रेल्वे स्थानक जलमय

जोरदार पावसामुळे नालासोपारा रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने नालासोपारा स्टेशन परिसर जलमय झाला आहे. याचा परिणाम रेल्वे वाहतूकीवर झाल्यामुळे गाड्या उशीराने धावत असल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

- Advertisement -

२४ तासातील पाऊस

मुंबई – १४० मिमी
पूर्व उपनगरात – ९६ मिमी
पश्चिम उपनगरात – १२०.९२ मिमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -