घरमुंबईमुसळधार पावसामुळे मुंबईची 'लाईफलाईन' विस्कळीत

मुसळधार पावसामुळे मुंबईची ‘लाईफलाईन’ विस्कळीत

Subscribe

मुंबईसह उपनगरात पावसाने एक वेगळचं रुप धारण केलं आहे. शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने २६ जुलैची आठवण करून दिली असून गेल्या २४ तासांपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस आहे. मुंबईत १५०-१८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. शनिवारी मध्य रेल्वेची वाहतूक ही १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू असून हार्बर मार्गावरील लोकल १५ मिनिटे उशिरा सुरू आहे. तसेच ट्रान्सहार्बर मार्गावरची ५ ते १० मिनिटे लोकलसेवा उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वेची स्थिती ही ५ ते १० मिनिटे उशिराने सुरू आहे.

मध्य रेल्वेच्या बदलापूर ते कर्जत येथे बिघाड झाल्यामुळे ही लोकलसेवा बंद करण्यात आली आहे. बिघाड दुरूस्त झाल्यानंतर या मार्गावरील सेवा पूर्ववत होईल. तसेच अंबरनाथ ते बदलापूर मार्गावरील लोकसेवा देखील बंद करण्यात आली आहे. मध्य रेल्वे येथील सायन आणि कुर्ला या दोन स्थानकांदरम्यान रूळावर पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे.

- Advertisement -

मुंबईतील मुसळधार पावसाचा परिणाम हा विमान उड्डाणांवर झाला आहे. मुंबई विमानतळावरील सात विमान उड्डाणे रद्द करण्यात आली होती. तसेच मुंबईतील काही सखल भागात पाणी साचले आहे.

- Advertisement -

मुंबईकडून कोल्हापूरकडे रवाना झालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या काही डब्यांमध्ये काल रात्री साडेआठ वाजता
बदलापूर आणि कर्जत मार्गावरील वांगणी रेल्वे स्थानकाजवळ पाणी शिरले. सुत्राच्या माहितीनुसार एकूण २००० प्रवाशी अडकल्याचे कळतं आहे. सध्या या एक्सप्रेसमधील प्रवाशांना वाचवण्याकरिता एनडीआरएफचे ऑपरेशन महालक्ष्मी सुरू आहे. आता महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या ५०० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली, पोलिसाकडून प्रवाशांना शांत राहण्याचं आवाहन

महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली, पोलिसाकडून प्रवाशांना शांत राहण्याचं आवाहन

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಜುಲೈ 26, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -