घरमुंबईरॅलीच्या माध्यमातून सांगितले हेल्मेटचे महत्त्व!

रॅलीच्या माध्यमातून सांगितले हेल्मेटचे महत्त्व!

Subscribe

आयोजकांच्या म्हणण्यानुसार, तरूणांमध्ये हेल्मेट वापरण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यांना हेल्मेटचे महत्त्व समजावे यासाठी ही रॅली काढण्यात आली.

वाहतूक नियमांना डावलून आजही अनेक जण हेल्मेट घालणं टाळतात. त्यावरून अनेकांचे ट्राफिक पोलिसांशी वाद देखील होतात. पण, ‘डबल टॉप’ टाकून बाईक चालवणार्‍यांसाठी पोलिसांनी हेल्मेटचे महत्त्व पटवून दिले. त्यासाठी हेल्मेट रॅली देखील काढण्यात आली. या रॅलीद्वारे हेल्मेटचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. डी.डी.विसपुते कॉलेज रोडवर सोमवारी ( १४ जानेवारी ) डी.डी.विसपुते कॉलेज नवीन पनवेल आणि प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलीस नवी मुंबई विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०१९ अंतर्गत हेल्मेट रॅली काढण्यात आली. यावेळी हेल्मेटची गरज काय? याबद्दल माहिती देण्यात आली. शासनाने दुचाकी चालकांसाठी हेल्मेट आणि चारचाकी चालकांसाठी सीटबेल्ट बंधनकारक केले आहे. पण, वाहन चालकांकडून याबाबी दुर्लक्षित केल्या जातात. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, तरूणांमध्ये हेल्मेट वापरण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यांना हेल्मेटचे महत्त्व समजावे यासाठी ही रॅली काढण्यात आली.

यावेळी वाहतूक शाखा नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, चेअरमन आदर्श शैक्षणिक प्रसारक मंडळाचे चेअरमन धनराज विसपुते, सहाय्यक आयुक्त अरुण पाटील, वरिष्ठ निरीक्षक अभिजित मोहिते, वाहतूक अधिकारी, कर्मचारी, तसेच विसपुते कॉलेजचे सर्व शिक्षक, प्रिन्सिपल, विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये विसपुते महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून रॅली निघाली. न्यू पनवेल, आदई सर्कल, खांदा कॉलनी, ठाणा नाका, बस स्थानक, पंचमुखी हनुमान मंदिर, तक्का, एमटीएनएल, शिवाजी चौक, विजय सेल्स, एचडीएफसी सर्कल, न्यू पनवेल रेल्वे स्टेशन असे करत विसपुते कॉलेजमध्ये रॅलीचा समारोप झाला.

- Advertisement -

हेल्मेट वापराबाबत सर्वाधिक उदासीनता दिसत आहे. शिवाय, काही गैरसमज देखील आहेत. गैरसमज दूर करण्यासाठी अशा प्रकारची रॅली काढणे गरजेचे आहे. मात्र, आदर्श शैक्षणिक प्रसारक मंडळाच्या वतीने हेल्मेट रॅलीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे.– सुनील लोखंडे, पोलीस उपायुक्त, नवी मुंबई वाहतूक शाखा

महिलांकडून संस्कार घेऊन आपण मोठे होतो. मात्र, पनवेलमधील विसपुते कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थ्यांकडून हेल्मेट रॅलीच्या माध्यमातून आज वाहनचालकांना खर्‍या अर्थाने हेल्मेट वापरासंदर्भात एक संस्कारच दिला आहे. – हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -