घरमुंबईघरीच उपचार घेणार्‍या कोरोनाग्रस्तांची संख्या दोन हजार

घरीच उपचार घेणार्‍या कोरोनाग्रस्तांची संख्या दोन हजार

Subscribe

109 रुग्णांना कृत्रिम प्राणवायू तर 24 रुग्ण अतिदक्षतेत

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा फटका रायगड जिल्ह्याला सर्वत्र बसू लागला आहे. जिल्ह्यात दाखल झालेल्या 2371 रुग्णांवर उपचार सुरू असून इस्पितळातील तयारीच्या एकूणच स्थितीचा अंदाज घेत सुमारे 87 टक्के रुग्णांना त्यांच्या घरीच ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात संसर्गाचा वेग कमालीचा वाढू लागल्याने 15 दिवसांतच दोन हजारांची संख्या पार केली आहे. रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या 109 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तर 24 रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

देश आणि राज्यभरात ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रसाराने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील संख्याही तितक्याच पटीने वाढू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये एकसारख्या संख्येत रुग्ण दाखल होत आहेत. डिसेंबर महिन्यात रुग्णसंख्या रोडावत जात एकेरी संख्येवर पोहचली होती. त्यामुळे जिल्ह्यातील जनता मोकळा श्वास घेत होती. सारे काही सुरू झाले असताना 21 डिसेंबरला हा आकडा वाढू लगला. 29 डिसेंबरला रुग्णांच्या संख्येने नव्वदी पार केली. 31 डिसेंबर रोजी रुग्णांची संख्या थेट 180 वर जाऊन पोहचली.

- Advertisement -

1 जानेवारी या नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात 196 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. लागलीच ही संख्या तीनशेच्या संख्येत पोहेचली. 4 जानेवारीला ती 418 पर्यंत पोहोचली. बुधवारी 5 जानेवारीला 749 रुग्ण आढळून विद्यमान रुग्णसंख्या 2 हजार 563 वर गेली. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली रुग्णसंख्या पाहता चिंता व्यक्त केली जाऊ लागली. मागे गेलेल्या 15 दिवसांत जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 2 हजार 914 झाली आहे. गेल्या आठ दिवसात मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 8 झाली असल्याची बाब दिलासादायक मानली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -