घरमहाराष्ट्रमनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

Subscribe

बीडमधील परळी येथे 2008 साली झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणी न्यायालयात वारंवार अनुपस्थित राहिल्याने परळी न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.

2008 मध्ये राज ठाकरे यांना डोंबिवलीत अटक करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ मनसैनिकांनी परळीमध्ये आंदोलन करत राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. या दगडफेकीत एसटी बसेसची काच फुटून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते. मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसेचे कार्यकर्त्यांच्या विरोधात परळी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

या प्रकरणात राज ठाकरे यांनी सहा वर्षांपूर्वी न्यायालयात हजर होऊन 300 रुपयांचा दंड भरला होता. त्यावेळी त्यांना न्यायालयाने जामीन दिला होता. पण राज ठाकरे सुनावणीसाठी वारंवार गैरहजर राहत असल्याने आता परळी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. मोरे-पावडे यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -