घरमुंबईराष्ट्रवादीच्या माजी आमदारावर आयकर विभागाची कारवाई

राष्ट्रवादीच्या माजी आमदारावर आयकर विभागाची कारवाई

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांच्याकडून आयकर विभागाने ४० लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली असून बाजोरीया यांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान या प्रकरणी पुढील चौकशी सुरु केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

बाजोरीया काल (१९ जून) नागपूरहून मुंबईला विमानाने प्रवास करत होते. दरम्यान त्यांनी ४० लाख रुपयांची रोकड जवळ बाळगली होती. बाजोरीया दूपारी १२ च्या सुमारास इंडिगो विमानाने नागपूरहून मुंबईला येत होते. नागपूर विमानतळावर तपासाणी दरम्यान त्यांच्या बॅगेत नोटा असल्याची माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्यांना समजली. त्यांनी याबाबत मुंबई आयकर विभागालाही कळवले आहे. टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी प्रकाशित केली आहे.

- Advertisement -

विदर्भातही चौकशी सुरु
विदर्भातील सिंचन कामांसाठी बाजोरीया आणि खाजगी कंत्राटदाराविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी सुरु आहे. अमरावती विभागात बांधण्यात येणाऱ्या धरणाचे कंत्राट मिळालेल्या एम. एस बजोरिया कंस्ट्रक्शन कंपनीच्या संचालकपदी बाजोरीया कार्यरत आहेत. आमदारकी मिळाल्यानंतर या कंपनीचा व्यवहार त्याचा भाऊ पाहत आहे. विमानतळावर रोकडसहीत पकडले गेल्यानंतर आयकर विभागाने बाजोरीया यांच्या यवतमाळ येथील कार्यालयाचीही चौकशी केली. मात्र या चौकशीत काही मिळाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

“नागपूर विमानतळावर प्रवेश करताना बाजोरीयाच्या बॅगेत मोठ्या प्रमाणात रोकड असल्याची माहिती एक्स रे तापसणी दरम्यान आम्हाला मिळाली. मात्र आम्हाला अधिकार नसल्याने आम्ही ही माहिती मुंबईतील आयकर विभागाला दिली.” – वरिष्ठ सीआयएसएफ अधिकारी

- Advertisement -

“मुंबईतील शुभदा टॉवर्स येथील फ्लॅटचा व्यवहार करण्यासाठी मी रोकड जवळ बाळगली होती. रोकड बँकेतून काढली असून त्याचा पुरावा माझ्या जवळ आहे. या फ्लॅटच्या व्यवहारासंबधीचे कागदपत्रही मी अधिकाऱ्यांना दाखवले आहेत”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -