घरमुंबईयावर्षीही लॉ शाखेच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधातरी

यावर्षीही लॉ शाखेच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधातरी

Subscribe

यावर्षीही लॉ शाखेच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधातरी

मुंबई विद्यापीठाचा निकाल गोंधळ अजूनही थांबायचे नाव घेत नाही. ऑनलाईन मूल्यांकनाचा फटका पुन्हा एकदा लॉ शाखेच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. येत्या २५ जून पासून एटीकेटीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. मात्र आधीच झालेल्या परिक्षापैकी जवळपास ४ हजारांपेक्षा जास्त उत्तरपत्रिकांचे पुनर्मुल्यांकन होणे बाकी आहे. ही परिस्थिती पाहता येत्या २५ जूनपर्यंत निकाल लागतील, अशी कोणतीही शक्यता वाटत नाही. त्यामुळे ज्यांनी पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज केले आहेत त्यांच्या संभ्रमावस्थेत आणखी भर पडली आहे. मागच्यावर्षी सुरु झालेली ऑनलाईन मूल्यांकनाची यंत्रणा असो किंवा त्याआधी लॉच्या प्रवेशासाठी सुरु केलेली सीईटी परिक्षा, या दोन्हीमुळे मागच्या दोन वर्षांपासून लॉचे विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत.

- Advertisement -

लॉ शाखेच्या विद्यार्थ्यांचा निकालाला विलंब

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन अट्टाहासामुळे मे महिन्यात होणारी एटीकेटीची परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. त्यादरम्यान पुढच्या सत्राच्या काही परिक्षा मे महिन्यात पार पडल्या. मात्र अजूनही त्याचा निकाल जाहीर न झाल्यामुळे येणाऱ्या परीक्षेला बसायचे की नाही ? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. काही विद्यार्थी संघटनांकडून देखील निकाल वेळेवर लावण्याची मागणी करण्यात आली होती.

- Advertisement -

“मुंबई विद्यापीठातील हजारो उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन अजूनही बाकी आहे. नवे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांनी यासंदर्भात त्वरीत लक्ष घालून निकालाचा प्रश्न मार्गी लावावा. लवकरात लवकर निकाल जाहीर करावेत अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल”, असा इशारा स्टुडंट लॉ कॉन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -