घरमुंबईएसआरएच्या इमारतीत रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत होणार सिल

एसआरएच्या इमारतीत रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत होणार सिल

Subscribe

कांदिवली ते दहिसर दरम्यानच्या बाधित क्षेत्रांमध्ये लॉकडाऊन

मागील काही दिवसांपासून उत्तर मुंबईतील कांदिवली ते दहिसर भागांमध्ये कोरोनाचा कहरच सुरु असून येथील झपाट्याने वाढणाऱ्या रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेचे अधिकारी व पोलिस हातात हात घालून काम करत आहे. त्यामुळे या विभागातील जेवढी बाधित क्षेत्र आहेत, त्यासर्वांच्या ठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, आतापर्यंत एखाद्या इमारतींमध्ये कोरेाना बाधित रुग्ण आढळून आल्यास केवळ मजलाच सिल केला जायचा . परंतु आता एसआरएच्या इमारतींमध्ये बाधित रुग्ण आढळून आल्यास संपूर्ण इमारतच सिल करून बाधित क्षेत्र म्हणून जाहीर केले जाणार आहे. उत्तर मुंबईत याची अंमलबजावणी केली जात आहे.

कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरात अवघ्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आजमितीस कांदिवलीमध्ये २०९०, मालाडमध्ये ३३७८, बोरिवलीमध्ये १८२५, तर दहिसरमध्ये १२७४ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. रुग्ण दुपटीचा काळ कांदिवलीत २५, मालाडमध्ये १९, बोरिवलीत १८, तर दहिसरमध्ये १५ दिवस आहे. कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे कांदिवली ते दहिसर दरम्यान ११५ परिसर बाधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तसेच ९०८ इमारती सिल करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मात्र, ज्या झोपडपट्टयांसह काही भागांमध्ये जिथे बाधित क्षेत्र आहेत, तिथे लोक नियमांचे पालन करत असून बेशिस्त वर्तन करत आहे. मास्क न लावता फिरणे, गप्पा मारत बसणे असे प्रकार होत असून यामुळेच बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांनी हातात हात घालून काम करण्याचा निर्णय घेत ज्या भागांमध्ये रुग्ण आढळून येत आहेत, तसेच जे बाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत, तिथे पोलिस कारवाई अधिक कडक करण्यात येत आहे. मात्र, येथील वाढती रुग्ण संख्या विचारात घेता पुढील काही कोरेाना बाधित रुग्ण मिळत असलेले परिसर व बाधित क्षेत्र आदी ठिकाणी लॉक-डाऊन घेत ही संख्या नियंत्रणात आणण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

मुंबईतील अनेक झोपडपट्टीचा विकास होवून एसआरएच्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे एसआरएच्या इमारतींमध्ये अधिक रुग्ण आढळून येत असल्याने यापुढे एसआरएच्या इमारतींमध्ये रुग्ण आढळल्यास ते मजला सिल न करता संपूर्ण इमारतच सिल करून बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याचा निर्णय परिमंडळ उपायुक्तांनी घेतला आहे. लॉक-डाऊन केलेल्या इमारतींसह बाधित क्षेत्रांमध्ये नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शेतकरी बनून कृषीमंत्र्यांनी घातली दुकानावर धाड


उत्तर मुंबईमधील ३४ वस्त्यांत संपूर्ण टाळेबंदी करण्यात येणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा दोन ते तीन वस्त्या आहे. त्याठिकाणी राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नियम न पाळणाऱ्या ८०० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून ही कारवाई आणखी कडक करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. तर महापालिकेच्या परिमंडळाचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उत्तर मुंबईत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कांदिवली ते दहिसर दरम्यान जे कोरोनाचे बफर झोन आहेत तसेच बाधित क्षेत्र आहे. त्याठिकाणी लॉक-डाऊन करण्यात येणार आहे. या दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहतील. परंतु त्याबरोबरच एसआरएच्या इमारतींमध्ये रुग्ण आढळल्यास ती इमारत बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करून तिथेही लॉक-डाऊन करण्यात येणार आहे. सध्या झोपडपट्टीतील रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले असून इमारतींमध्ये हे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे इमारतींमध्ये कडक पावले उचलण्याच्यादृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे शंकरवार यांनी हे स्पष्ट केले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -