घरताज्या घडामोडी'बेस्ट'चा अजब फतवा; तिकीट मशीन बिघडल्यास वाहकाच्या पगारातून पैसे कापणार

‘बेस्ट’चा अजब फतवा; तिकीट मशीन बिघडल्यास वाहकाच्या पगारातून पैसे कापणार

Subscribe

कंडक्टरच्या पत्र्याच्या पेटीतील बेस्टचे पंच तिकीट बंद झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्युइंग मशीनवर तिकीट दिलं जात आहे. मात्र, हे तिकीटं मशीनमध्ये अनेकदा बिघाड निर्माण होताना पाहायला मिळत आहे. परंतु, आता या तिकीट मशीनमध्ये बिघाड झाल्यास त्याचा फटका बसच्या वाहकाला बसणार आहे.

कंडक्टरच्या पत्र्याच्या पेटीतील बेस्टचे पंच तिकीट बंद झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्युइंग मशीनवर तिकीट दिलं जात आहे. मात्र, हे तिकीटं मशीनमध्ये अनेकदा बिघाड निर्माण होताना पाहायला मिळत आहे. परंतु, आता या तिकीट मशीनमध्ये बिघाड झाल्यास त्याचा फटका बसच्या वाहकाला बसणार आहे. बेस्टने यासंदर्भात तसा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. (If Ticket Machine Failed The Amount Will Be Reduced From Conductors Salary)

तिकीटाचे मशीन बिघडल्यास आता कंडक्टरच्या पगारातून पैसे कापले जाणार असल्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. बेस्टच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, बेस्टचे कर्मचारी या विरोधात निदर्शने करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

बेस्ट प्रशासनाने तिकीट काढण्यासाठीच्या ईटीआय मशीनची देखभाल करण्याबद्दल एक परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये कंडक्टर आणि इतर ग्राऊंड स्टाफला मशीनची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. या तिकीट मशीनच्या सुट्ट्या भागांचे दरही या पत्रकात दिले आहेत. यामध्ये 15 पार्ट्स आहेत, त्यापैकी सर्वात महाग पार्ट म्हणजे मेन बोर्डचा खर्च 8 हजार 438 रुपये दाखवण्यात आला आहे.

या पैकी कोणत्याही पार्टमध्ये बिघाड झाल्यास त्याचा खर्च कंडक्टरच्या पगारातून कापून घेण्यात येणार आहे. बेस्टच्या या निर्णयामुळे कर्मचारी संतप्त झाले असून, आज वडाळा आगारात हे कर्मचारी बेस्ट प्रशासनाविरोधात निदर्शने करणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या नव्या चिन्हाचं पोस्टर जाहीर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -