घरमुंबईकामानिमित्त मंत्रालयात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; गृह विभागाकडून कठोर नियमावली जारी

कामानिमित्त मंत्रालयात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; गृह विभागाकडून कठोर नियमावली जारी

Subscribe

मुंबई : मंत्रालयात होणारी गर्दी तसेच आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन गृह विभागाने अभ्यागतांच्या मंत्रालय प्रवेशासाठी कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय  घेतला आहे. त्यानुसार अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश पास देण्यात येणार आहे. प्रवेश करण्यासाठी कलर कोडेड प्रवेशपास तसेच त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. (Important news for those going to Ministry for work Strict regulations issued by Home Department)

मंत्रालयातील  लाचखोरी रोखण्यासाठी 10 हजारांपेक्षा अधिक रोख रक्कम असेल तर, मंत्रालयात प्रवेशच दिला जाणार नाही, अशा मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय गृह विभागाकडून मंगळवारी जारी करण्यात आला. या सूचनांची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अभ्यागतांच्या मंत्रालय प्रवेशावर मर्यादा येणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – सेव्हन हिल्स हॉस्पिटल BMC ने ताब्यात घ्यावे; काय आहे काँग्रेसच्या मागणी मागचे कारण

मंत्रालयात दररोज सरासरी तीन ते साडेतीन हजार अभ्यांगत येत असतात. मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयात तोबा गर्दी होते. पाच साडेपाच हजारांपेक्षा जास्तीची गर्दी मंत्रालयात होत असते. मंत्रालयाच्या मध्यवर्ती प्रांगणातील त्रिमूर्ती शिल्पाजवळ तसेच गार्डनमध्ये सेल्फी काढत बसण्याचे प्रकारही सध्या वाढले आहेत. मंत्रालय सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलीस यंत्रणेवर यामुळे मोठा ताण पडत असतो. गर्दी रोखण्यासाठी निवेदन, अर्ज घेऊन येणाऱ्यांना स्वतंत्र व्यवस्था मंत्रालय प्रवेशद्वाराशेजारीच करण्यात आली. मात्र त्यानंतरही ही गर्दी काही कमी झालेली नाही. त्यामुळे आता गृहविभागाने मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. त्यातील काही नियम तात्काळ अंमलात येत असून काही नियम येत्या काही दिवसांत अंमलात येणार आहेत.

- Advertisement -

वाहनांसाठी आरएफआयडी टॅग, खाद्यपदार्थ आणण्यावरही बंदी

वेबपोर्टल आणि मोबाईल ॲपद्वारे अभ्यांगतांची नोंदणी होणार आहे. ज्या विभागात जायचे आहे, त्या मजल्यावरच अभ्यागतांना प्रवेश देण्यात येईल. इतर कुठेही जायची अनुमती त्यांना नसेल. प्रवेश करणाऱ्या वाहनांना आरएफआयडी टॅग लावण्यात येईल. संध्याकाळी सव्वासहानंतर पोलीस संपूर्ण मंत्रालयाची तपासणी करून अभ्यागत थांबले असल्यास त्यांना बाहेर काढतील. बाहेरील खाद्यपदार्थांवर देखील बंदी घालण्यात येणार आहे. अपवाद फक्त कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या डब्यांचा आहे.

हेही वाचा – Mumbai Municipal Ganeshotsav Competition 2023 : पंचगंगा सार्वजनिक मंडळाला प्रथम पुरस्कार

उड्या रोखण्यासाठी प्रत्येक मजल्याला जाळ्या

मंत्रालयात गच्चीवर जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात येतील. मंत्रालयाच्या मजल्यावरून  उड्या मारण्याचे प्रकार  रोखण्यासाठी मजल्यांवर अदृश्य  स्टील रोप्स लावण्यात येणार आहेत. या जाळ्यांमुळे मजल्यावरून साधे खाली डोकावताही येणार नाही. मंत्रालयाच्या आवारात असणाऱ्या भटक्या कुत्री, मांजरांनाही आता बाहेर काढले जाणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेला या भटक्या प्राण्यांचा प्रतिबंध करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -