घरमुंबईबलात्कार करणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा योग्य

बलात्कार करणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा योग्य

Subscribe

बलात्कारासारखे घटना सर्रास चालू असल्याचे दिसून येते. त्यामुळे बलात्कार करणाऱ्या दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा होणे आवश्यक आहे.

प्रत्येक देशात, जिल्ह्यात बलात्कारासारखे घटना या सर्रास चालू असल्याचे दिसून येते. या घटना कमी होण्यापेक्षा वाढत जात आसल्याच दिसून येत आहे. ही वाढते बलात्कार प्रकरण लक्षात घेता बलात्काराच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती करणाऱ्यांवर वचक घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतुदी असणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय दंड संहितेत बलात्काराची पुनरावृत्ती खटल्या संबंधीत मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या तरतूदीत नव्याने आणलेले कलम ३७६(ई) योग्य असल्याचा युक्तीवाद ‘न्यायालयाचे मित्र’ म्हणजेच न्यायालयाला मदत करणारे न्यायालयीन वकिलांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये केला आहे.

कलम ३७६(ई) मध्ये पहिल्या पासूनच मृत्यूदंडाची शिक्षेची तरतूद आहे. पण त्यामध्ये जर पीडितेचा मृत्यू झाला किंवा ती कोमात केली तरच मृत्यूदंडाची शिक्षा आहे . तर नवीन तरतूदीमध्ये बलात्कार गुन्ह्याची पुनरावृत्ती केली तर मृत्यूदंडाची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

– अॅड. आबाद पोंडा, न्यायालयीन मित्र (अमाइकस क्युरी)

एकाला जन्मठेप तर तिघांना फाशी  

दि. २२ ऑगस्ट २०१३ रोजी महालक्ष्मी येथील शक्ती मिलमध्ये महिला वृत्तछायाचित्रकारीतेवर बलात्कार झाला होता. ती महिला छायाचित्रकार सहाकाऱ्यासोबत छायाचित्रण करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्यावर पाच जणांनी बलात्कार केला होता. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी विजय जाधव, कासिम बंगाली, सलिम अन्सारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली. अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली, तर मुंबई सत्र न्यायालयाने सिराजला जन्मठेप आणि इतर तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

- Advertisement -

कलम ३७६(ई) वर प्रश्नचिन्ह

शक्ती मिल कम्पाऊंडमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या त्या तिघांच्या याचिकेवरील सुनावणीत न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने अॅड. आबाद पोंडा यांना न्यायालयीन मित्र म्हणून नेमले आहे. पोंडा यांनी असा युक्तीवाद मांडला की, ‘राज्यघटनात्मक तत्त्वे व सर्व कायदेशीर तरतुदी लक्षात घेता कठोर शिक्षेची ही तरतूद सुसंगत आहे. त्यात काही अवैध दिसत नाही’. मात्र त्यावेळी ते म्हणाले, शक्ती मिल प्रकरणी हे कलम ३७६(ई) लावणे कित्पत योग्य आहे, यावर प्रश्नचिन्ह आहे.

दुसरा गुन्हा घडायलाच नको

निर्भया बलात्कार प्रकरणानंतर कलम ३७६(ई) यामध्ये सुधारणा केली. त्यामध्ये एकापेक्षा अधिक वेळा केले जाणरे बलात्काराचे कृत्य करणाऱ्यांला फाशीची शिक्षा ठोठावण्याची तरतूद केली आहे. त्यानंतरच अॅड. आबाद पोंडा यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती झाली होती. यांनी ‘जर आरोपी आधीच्या बलात्कार प्रकरणी दोषी ठरला तरच त्याला मृत्यूदंडाची शिक्षा लावण्यात येईल’ असे त्यांनी मत मांडले आहे. तर केंद्र सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी ‘बलात्काराचा दुसरा गुन्हा हा पहिल्या गुन्ह्यानंतर कधीही घडू शकतो. त्यामुळे गुन्हा सिद्ध झाल्यानंतरच दुसरा गुन्हा घडायला हवा, हा युक्तिवाद मान्य करता येणार नाही’ असा युक्तीवाद मांडाला आहे. शक्ती मिल बलात्कार प्रकरणी दोषींना नव्या कलमाच्या तरतूदी प्रमाणे मृत्यूदंडाची शिक्षा ठेठावली होती. त्या तिघांनी त्या याचिकेला अॅड. युग चौधरी मार्फत आव्हान केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -