घरदेश-विदेशभारतावर समुद्रामार्गे हल्ला होण्याची शक्यता

भारतावर समुद्रामार्गे हल्ला होण्याची शक्यता

Subscribe

जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी भारतावर समुद्रमार्गे हल्ला करण्याची शक्यता नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी व्यक्त केली आहे.

जम्मू काश्मीरच्या पुलवामाच्या भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेईएम) यासारख्या संघटनांचे दहशतवादी समुद्रमार्गे येऊन भारतातील बंदरे, कार्गो जहाजे तसेच तेलवाहू जहाजांवर हल्ला चढविण्याची शक्यता आहे. तसेच दहशतवाद्यांना वेगवेगळ्या प्रकारे हल्ले करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे समुद्र मार्गानेही दहशतवादी हल्ला करु शकतात, अशी शक्यता नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी व्यक्त केली आहे. तसेच नौदल आणि तटरक्षक दलाला सतर्क राहण्याचे आदेश देखील केंद्र सरकारने दिले आहेत.

- Advertisement -

संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि राजनैतिक अधिकाऱ्यांच्या एका कार्यक्रमात नौदल प्रमुख लांबा बोलत होते. एका देशानं पुरस्कृत केलेल्या दहशतवादाचे परिणाम भारत भोगत आहे, असे म्हणत त्यांनी पाकिस्तानवर अप्रत्यक्ष निक्षाणा साधला आहे. पुलवामा जिल्ह्यात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचे भयावह रुप सगळ्यांनीच बघितलं आहे. भारताला अस्थिर करु पाहणाऱ्या देशाचा दहशतवाद्यांना पाठिंबा आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांना गेल्या काही वर्षांत दहशतवादाची मोठी झळ बसली असून जगातील काही देशच यातून वाचले आहेत. आता दहशतवाद वैश्विक पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे धोका अधिकच वाढला आहे, असंही ते म्हणाले आहेत.

हल्ल्याची जूनपासून तयारी

पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेईएम) यासारख्या संघटनांनी सागरी मार्गाने घुसखोरी करुन हल्ले चढविण्यासाठी जून महिन्यापासून तयारी सुरु केली आहे. मुंबईत २००८ मध्ये अशा प्रकारचे हल्ले चढविण्यात आले होते. त्याच घटनांची पुनरावृत्ती भारतात अन्य ठिकाणी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. खोल समुद्रात पोहण्याचे प्रशिक्षण जैश-ए-मोहम्मदकडून सध्या दहशतवाद्यांना दिले जात आहेत. मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी नौदलाने १० दहशतवाद्यांना पोहण्यापासून अनेक हेडली याची तपास यंत्रणेकडून २०१० मध्ये चौकशी करण्यात आली होती. त्यात ही बाब समोर आली आहे.

- Advertisement -

वाचा – पुलवामानंतर मुंबई सावध

वाचा – पाकचा कांगावा; पुलवामा हल्ल्यामध्ये ‘जैश’चा हात नाही


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -