घरमुंबईमॉल्स,शॉपिंग सेंटरच्या प्रवेशद्वारांसह वाढीव जागेतील अतिक्रमणे हटणार

मॉल्स,शॉपिंग सेंटरच्या प्रवेशद्वारांसह वाढीव जागेतील अतिक्रमणे हटणार

Subscribe

मुंबईतील अनेक मॉल्स, शॉपिंग सेंटरसह चित्रपटगृहे तसेच नाट्यगृहांची अग्निसुरक्षेच्या दृष्टीकोनातून तपासणी करण्यात येत आहे. परंतु अनेक मॉल्ससह शॉपिंग सेंटरच्या प्रवेशद्वारासह मोकळ्या जागेत वाढीव बांधकाम करत स्टॉल्स उभारले गेले आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या सर्वच वाढीव जागेतील स्टॉल्ससह बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शनिवारी आढावा बैठकीत दिले.

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका अधिकार्‍यांची मासिक आढावा बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली होती. महापालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड यांच्यासह महापालिकेचे संबंधित सहआयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. या बैठकीत महापालिका आयुक्तांनी अग्निसुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्वच विभागाच्या सहायक आयुक्तांना आदेश दिले आहेत.

- Advertisement -

मुंबईतील मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तळघर, गोडाऊन, उपहारगृहे इत्यादींची अग्निसुरक्षेच्या दृष्टीकोनातून तपासणी व कारवाई नियमितपणे करण्यात येत आहे. या अनुषंगाने मोठ्या किंवा महत्त्वाच्या रस्त्यांवरील दुकानांसह गाळ्यांची अग्निसुरक्षा विषयक तपासणी केली जात असतानाच आडरस्त्यावर किंवा गल्ली-बोळात असणार्‍या दुकानांची तपासणी काळजीपूर्वक करण्याचे निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिले.

तसेच ज्या भागात जागांच्या अधिक किंमती असतात, अशा भागांमध्ये अनधिकृत वाढीव बांधकामे किंवा तात्पुरती उभारणी होण्याची शक्यता अधिक असते, हे लक्षात घेऊन अशा परिसरांमध्ये अधिक काळजीपूर्वक तपासणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. मॉल्स,शॉपिंग सेंटरसह इतरांच्या प्रवेशद्वार किंवा पदपथालगत पॉपकॉर्न व्हेडींग मशीन, पार्सल काऊंटर अथवा तात्पुरत्या स्वरुपातील अनधिकृत वाढीव बांधकामांसारख्या बाबी उभारल्या गेल्याचे दिसून आल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी. जेणेकरुन भविष्यातील आपत्ती प्रसंगी उद्भवणारा अडथळा दूर होईल,असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

महापालिकेद्वारे सुरु करण्यात आलेल्या अग्निसुरक्षा विषयक तपासणी दरम्यान ज्या मॉल्स,शॉपिंग सेंटरसह इतरांना त्रुटींच्या अनुषंगाने नोटीस तथा तपासणी अहवाल देण्यात आला आहे. त्यांची आवश्यक त्या बाबींची पूर्तता ठराविक कालावधी दरम्यान करवून घेणे आवश्यक आहे. यानुसार पूर्तता झाली असल्याची पुनर्तपासणी तातडीने सुरु करण्याचे व ज्याठिकाणी अपेक्षित बाबी पूर्ण झाल्या नसतील, तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही अजोय मेहता यांनी दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -