घरमुंबईरुळ ओलांडणार्‍यांना बांधली राखी

रुळ ओलांडणार्‍यांना बांधली राखी

Subscribe

गुरुकुल शाळेचा अभिनव उपक्रम

बदलापूर रेल्वे स्थानकात रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मात्र यावेळी राख्या बांधणारे विद्यार्थी होते तर ज्यांना राख्या बांधल्या ते रेल्वे रूळ ओलांडणारे प्रवासी. वेळ वाचवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करणार्‍या प्रवाशांना यावेळी विद्यार्थ्यांनी राख्या बांधल्या. बदलापूरच्या योगी श्री अरविंद गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला. यातून रेल्वे रूळ ओलांडणे कसे धोक्याचे आहे. हा धोका कोणीही पत्करू नये, असा संदेशही देण्यात आला.

बदलापूर रेल्वे स्थानकात दररोज शेकडो रेल्वे प्रवासी रेल्वे रूळ ओलांडतात वेळ वाचवण्यासाठी अनेक प्रवासी या जीवघेण्या मार्गाचा वापर करतात. यामुळे गेल्या काही वर्षात अनेक अपघात होऊन त्यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले होते. याबाबत जनजागृती करण्यासाठी योगी श्री अरविंद गुरूकुल शाळेच्या विद्यार्थ्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकात एक अनोखा उपक्रम राबवला. रक्षाबंधनाचे औचित्य साधून बुधवारी रेल्वे रूळ ओलांडणार्‍या प्रवाशांना या शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांनी विविध संदेश देणार्‍या राख्या बांधल्या. यात धावत्या लोकलमध्ये चढू अथवा उतरू नका, रेल्वे रूळ ओलांडू नका असे संदेश लिहले होते. रेल्वे स्थानकावर सुरू झालेल्या या उपक्रमात ज्येष्ठ, तरूण, विद्यार्थी आणि महिलांनाही या संदेश देणार्‍या राख्या बांधण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -