घर मुंबई Irshalwadi : बेपत्ता 57 व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देणार; मदत आणि पुनर्वसनमंत्र्यांनी दिली...

Irshalwadi : बेपत्ता 57 व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देणार; मदत आणि पुनर्वसनमंत्र्यांनी दिली माहिती 

Subscribe

मुंबई : ईरशाळवाडी (ता. खालापूर, जि. रायगड) येथे भूस्खलन होऊन दरड कोसळल्याच्या दुर्घटनेत 57 व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोध न लागल्याने स्थानिक चौकशीच्या आधारे सदर बेपत्ता व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख रुपये आणि राज्य आपत्ती सहायता निधीतून चार लाख रुपये, असे प्रत्येकी पाच लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री (Minister for Relief and Rehabilitation) अनिल पाटील (Anil patil) यांनी दिली. (Irshalwadi Will grant grant to heirs of 57 missing persons Information given by Minister for Relief and Rehabilitation)

हेही वाचा – आंदोलनाआधीच राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा वाढवला महागाई भत्ता वाढवला; किती टक्क्यांनी वाढ?

- Advertisement -

संबधित प्रशासनाकडून बचाव आणि मदतकार्य पार पडल्यानंतर प्राप्त माहितीनुसार या ठिकाणी 228 व्यक्ती वास्तव्यास होत्या. त्यापैकी 144 व्यक्ती हयात असून दुर्घटनेमध्ये 84 लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी 27 मृतदेह सापडले. तर  57 व्यक्ती बेपत्ता आहेत. प्रत्यक्ष दुर्घटनाग्रस्त ठिकाणची परिस्थिती विचारात घेऊन 23 जुलै 2023 रोजी सायंकाळी बचाव आणि शोधकार्य थांबविण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला होता.

दुर्घटनेतील मृतदेह आढळून आलेल्या 27 व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तसेच 20 व्यक्तींच्या वारसांना 1 लाख रुपये इतके अनुदान मुख्यमंत्री सहायता निधीतून वाटप करण्यात आलेले आहे. यामधील सात  मयत व्यक्ती आणि 57 बेपत्ता व्यक्तींना प्रशासनाने स्थानिक चौकशी करून अनुदान वाटप करण्याची मागणी मंजूर झाली असून या दुर्घटनेतील मयत व्यक्तींच्या वारसांना शासनाच्या निकषाप्रमाणे मदत करण्यात येणार आहे. हा निधी तत्काळ वितरित करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत, असे अनिल पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरने शेतात आराम करायला जायला वेळ, पण…; दुष्काळी परिस्थितीवर ठाकरेंचा टोला

इर्शाळवाडी दुर्घटना कशी घडली?

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळ गडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर मुसळधार पावसामुळे 20 जुलै रोजी रात्री 11 दरम्यान दरड कोसळली. दरड कोसळल्याने इर्शाळवाडीतील जवळपास 40 घरं दरडीखाली गाढली गेली. दरड कोसळल्याची माहिती मिळताच युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले होते. अनेक नेत्यांनी दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली होती. एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांच्या मदतीने दरडीखाली अडकलेल्या ग्रामस्थांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु 27 जणांचा मृत्यू झाला असून 57 जण बेपत्ता झाले. या दरड दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यानंतर राज्य सरकराने तात्पुरत्या स्वरुपात राहण्याची सोय करण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार आता इर्शाळवाडीतील ग्रामस्थांची निवारा केंद्रात राहण्याची सोय करण्यात आली आहे.

- Advertisment -