Eco friendly bappa Competition
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शनिवार ०९ सप्टेंबर २०२३

राशीभविष्य : शनिवार ०९ सप्टेंबर २०२३

Subscribe

मेष : तुम्हाचा राग अनावर होईल. वाद वाढेल. प्रवासात धोका संभवतो. तुमचा विचार इतरांना पटणे कठीण आहे.

- Advertisement -

वृषभ : आज महत्त्वाचे काम करून घ्या. घरातील व्यक्तीची काळजी वाटेल. संसारात कामाचा व्याप वाढेल. नम्र रहा.

मिथुन : अपेक्षित व्यक्तीची भेट होईल. मैत्री वाढेल. धंद्यात फायदा होईल. कला-क्रीडा स्पर्धेत चमकाल.

- Advertisement -

कर्क : नोकरीत वर्चस्व सिद्ध करण्यास नम्रपणे बोला. उतावळेपणा नको. यश प्रयत्नाने मिळेल. वस्तू नीट ठेवा.

सिंह : प्रकृतीवर ताण पडेल. राग वाढेल. प्रवासात सावध रहा. धंद्यात मोठे काम मिळेल. नवा विषय शिकाल.

कन्या : आज ठरविलेले काम उद्यावर टाकू नका. घरातील कामे होतील. कोर्ट कचेरीचा प्रश्न सोडवा. धंदा मिळेल.

तूळ : अचानक कार्यक्रम बदलावा लागेल. खर्च होईल. क्षुल्लक कारणाने मन उदास होईल. शांत मन ठेवा.

वृश्चिक : आजचे काम आज वेळेत पूर्ण करता येईल. स्पर्धेत जिंकाल. घर, वाहन घेण्याचा विचार कराल.

धनु : किरकोळ कामाचा त्रास वाटेल; पण कामे होतील. स्पर्धेत प्रगती कराल. नवीन ओळख होईल.

मकर : अडचणीतून मार्ग काढता येईल. स्वतःची कामे स्वतः करा. ओळखी होतील. धंद्यात आळस करू नका.

कुंभ : धंद्यात मोठे काम मिळेल. स्पर्धेत जिंकाल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत फायदा होईल.

मीन : व्यवसायात नवा विचार करता येईल. कुटुंबात महत्त्वाची घटना घडेल. वाटाघाटीत यश मिळेल.

- Advertisment -