घरदेश-विदेशइसिसच्या दहशतवाद्यांचा होता राज्यात केमिकल अ‍ॅटॅकचा कट

इसिसच्या दहशतवाद्यांचा होता राज्यात केमिकल अ‍ॅटॅकचा कट

Subscribe

औरंगाबाद आणि मुंब्रा येथून अटक करण्यात आलेल्या इसिस या संघटनेच्या ९ दहशतवाद्यांनी मुंबईसह राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये अन्न आणि पाण्यात घातक रसायन मिसळून विषप्रयोग करण्याचा बेत आखला होता, त्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात प्राणहानी घडवून आणायची होती.

मात्र वेळीच इसिसचा हा बेत हाणून पाडण्यात दहशतवाद विरोधी पथकाला यश आले, अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद कुलकर्णी यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या ९ जणांपैकी ५ जणांना औरंगाबाद येथून तर ४ जणांना ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून अटक करण्यात आलेली आहे.

- Advertisement -

अटक करण्यात आलेल्यापैकी एक जण १७ वर्षाचा अल्पवयीन कॉलेज विद्यार्थी आहे, एक जण गुन्हेगारी विश्वातील डॉन दाऊद इब्राहिम याच्या टोळीतील गुंड रशीद मलबारी याचा मुलगा आहे.

दहशतवाद विरोधी पथकाने औरंगाबाद आणि मुंब्रा येथे टाकलेल्या छाप्यात वेगवेगळी रसायने (केमिकल) तसेच रासायनिक पावडर, विषारी द्रव आणि मोठ्या प्रमाणात पेन ड्राइव्ह, लॅपटॉप, मोबाईल, वायफाय राऊटर मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

मोहम्मद मोहसीन खान, काजी सिराज खान, मोहम्मद मुसाहेदुल इस्लाम, सलमान खान, फहाद खान आणि मोहसीन मलबारी मोहम्मद मझहर खान आणि एक जण १७ वर्षाचा कॉलेज विद्यार्थी आहे. औरंगाबाद येथून ५जणांना तर मुंब्रा येथून अल्पवयीनसह ४ जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी पहाटेपासून राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे १२ पथके करीत होती. काही पथके परभणी, नांदेड आणि जालना या ठिकाणी दाखल झाली असून तेथूनही काही जणांना ताब्यात घेण्यात येण्याची शक्यता आहे.

राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, औरंगाबाद मराठवाडा परिसरातून काही संशयित हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमचे राज्यभरातील १२ पथके गेल्या काही आठवड्यापासून या माहितीवर काम करीत होती. दरम्यान औरंगाबाद आणि मुंब्रा येथून सोमवार आणि मंगळवारी पहाटे ९ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी सुरू केली. तपासादरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या ९ जणांकडे मोठ्या प्रमाणात विषारी रसायन द्रव, विषारी पावडर, मोबाईल फोन्स, संगणक, लॅपटॉप, पेनड्राइव्ह,हार्डडिस्क, मेमोरी कार्ड, ग्राफिक कार्ड, सीडी,डिव्हिडी, इंटरनेट डोंगल, वायफाय राऊटर हे सर्व औरंगाबाद आणि मुंब्रा येथील विविध ठिकाणी छापेमारी करून हस्तगत करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री या ९ ही जणांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली, बुधवारी त्यांना औरंगाबाद येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते.

अटक करण्यात आलेल्या ९ जणांमध्ये दोघे केमिकल इंजिनीयर असून, एक जण फार्मासिस्ट आहे. अटक करण्यात आलेले ९जण हे इसिस या दहशतवादी संघटनेशी निगडित असून त्यातील काही जण थेट इसिसच्या म्होरक्याच्या संपर्कात होते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यातील मुख्य आरोपी मोहम्मद मोहसीन सिराजउल्लाह खान याचे औरंगाबाद शहरात शूमार्ट आहे. त्याने काही वर्षांपूर्वी मोबाईलवर फोनवर ‘उम्मद -ए- मोहम्मदिया’ नावाने २० व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप चालवत होता. त्या ग्रुपमध्ये अटक करण्यात आलेले त्या ग्रुपमध्ये होते. ग्रुपमध्ये असलेल्याचा शोधासाठी एटीएसचे काही पथक परभणी, जालना,नांदेड परिसरात शोध घेत आहेत.

अटक करण्यात आलेल्या इसिस संघटनेच्या या दहशतवादी यांनी मुंबईसह राज्यातील इतर महत्वाच्या शहरात विषारी रसायन द्रव्याचा हल्ला करण्याचा मनसुबा होता, हे हल्ले अन्न आणि पाण्यातून करण्याचा त्यांचा बेत होता, त्यासाठी त्यांनी शहरात होणारे सोहळे,अतिगर्दी होणारे कार्यक्रम हे त्यांचे लक्ष होते,या सोहळ्यात अथवा कार्यक्रमातील पाण्यात आणि अन्नात रासायनिक विषारी द्रव मिसळून विषप्रयोग करण्याचा बेत होता, अशी माहिती एटीएसप्रमुख कुलकर्णी यांनी दिली.
मुंबईतील तसेच राज्यातील धरणेदेखील या संघटनेच्या लक्ष्यावर असण्याची शक्यता अतुलचंद्र कुलकर्णी यांनी वर्तवली आहे.

औरंगाबादच्या दोन जलकुंभांची रेकी
अटक करण्यात आलेल्या ९ जणांपैकी औरंगाबाद येथून अटक करण्यात आलेल्या मोहम्मद मोहसीन खान याने इतर दोघांसह काही आठवड्यापूर्वी औरंगाबाद शहरातील दोन जलकुंभांची रेकी करून जलकुंभाचे छायाचित्रे काढून तेथील नकाशा तयार केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. अटक करण्यात आल्यानंतर एटीएसच्या अधिकार्‍यांनी आरोपीसह या जलकुंभांना भेट दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -