घरमुंबईयूएस कॉलेज बोर्डच्या यादीत जय हिंद कॉलेजचा समावेश

यूएस कॉलेज बोर्डच्या यादीत जय हिंद कॉलेजचा समावेश

Subscribe

शहरातील पहिले कॉलेज

परदेशात शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेली ‘सॅट’ ही परीक्षा घेण्यासाठी अमेरिकन कॉलेज बोर्डने चर्चगेट येथील जय हिंद कॉलेजला त्यांच्या बोर्डाची मान्यता दिली आहे. ही मान्यता मिळवणारे हे शहरातील पहिले कॉलेज ठरले आहे. केवळ परीक्षाच नाही तर तेथील अभ्यासक्रम, शैक्षणिक पद्धतीही अवगत करता येऊ शकणार आहे. याचा फायदा कॉलेजातील विद्यार्थ्यांना होणार आहे.

भविष्यात या कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी ‘सॅट’चा गुणांचा विचार केला जाऊ शकेल. आत्तापर्यंत विले पार्ले येथील ‘एनएमआयएमएस’चा ‘यूएस कॉलेज बोर्ड’मध्ये समावेश होता. आता जय हिंद कॉलेजाचाही यात समावेश झाल्याने मुंबई तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळणार आहे. सध्या भारतातील ३० शिक्षण संस्था आणि परदेशातील एमआयटी, कोलंबिया विद्यापीठ, कॅम्ब्रिज विद्यापीठ तसेच येले एन यूएस कॉलेज यांच्यासह आठ परदेशी विद्यापीठांचा यामध्ये समावेश आहे.

- Advertisement -

याशिवाय जगभरातील एकूण सहा हजार शैक्षणिक संस्था या बोर्डाशी जोडल्या गेलेल्या आहेत. कॉलेज बोर्डचे सर्व नियम पाळून शिक्षणात उत्तम दर्जा देणार्‍या संस्थांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न बोर्ड कडून सुरू आहे. यामुळे देशातील उच्च शिक्षणाची दिशा बदलणार असून विद्यार्थ्यांना नवनवीन प्रायोग करता येणे शक्य होणार आहेत. तसेच विविध देशांमध्ये शिक्षणाची कवाडेही खुली होणार आहे. यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना देशातील कॉलेजमध्ये तसेच परदेशातील कॉलेजांमध्ये समान शिक्षणाची संधीही मिळू शकणार आहे.

बोर्डाने जय हिंद कॉलेजची निवड केली ही आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब असल्याचे कॉलेजचे प्राचार्य डॉ. अशोक वाडिया यांनी सांगितले. या बोर्डाशी जोडले गेल्यामुळे आमच्या कॉलेजमधील विद्यार्थी आता बोर्डाशी संबंधित कोणत्याही शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन काही कालावधीसाठी शिक्षण घेऊ शकणार आहेत. तसेच बोर्डातर्फे पुरविण्यात येणार्‍या सर्व शैक्षणिक सुविधांचे लाभही घेऊ शकणार आहेत असेही ते म्हणाले.

- Advertisement -

इतकेच नव्हे तर कॉलेजातील विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील वेगळे स्थान मिळू शकणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, कॉलेज प्रवेश हे ‘सॅट’च्या गुणांच्या आधारे देण्याचा निर्णय झालेला नाही. मात्र भविष्यात याबात विचार होऊ शकतो असेही डॉ. वाडिया म्हणाले. याचबरोबर शहरातील अधिकाधिक शैक्षणिक संस्था या बोर्डाशी संलग्न कशा होतील यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे डॉ. वाडिया यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -