घरताज्या घडामोडीमोदी-शहांना जे हवं होतं तेच घडत आहे - शिवसेना

मोदी-शहांना जे हवं होतं तेच घडत आहे – शिवसेना

Subscribe

दिल्लीच्या जेएनयूमध्ये रविवारी रात्री झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात वातावरण तापत असताना शिवसेनेने या सगळ्यासाठी भाजप आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना जबाबदार धरले आहे. ‘देशात अराजकता निर्माण करणारं राजकारण धोकादायक असून त्यामुळे देशाचे तुकडे पडतील. विद्यापीठे, महाविद्यालये रक्ताने भिजवायची, विद्यार्थ्यांना मारहाण करायची आणि त्यातून पेटलेल्या होळीवर सत्तेची पोळी शेकायची. इतकं निर्घृण राजकारण कधी कुणी केलं नव्हतं. जेएनयूमधल्या हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटू लागले आहेत. मोदी-शहांना जे हवं होतं तेच घडताना दिसत आहे. देश संकटात आहे’, अशी थेट टिप्पणी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे. तसेच, ‘विद्यापीठे राजकारणापासून दूर राहावीत असं भाजपनं सांगितलं. पण गेल्या ५ वर्षांमध्ये विद्यापीठांत राजकारण आणि हिंसाचार कुणी घुसवला? आपल्या विचाराचे नाहीत, त्यांना उखडून टाकायचं आणि त्यासाठी सत्तेचा मस्तवाल वापर करायचा हे धोरण कोण राबवत आहे?’ असा सवाल देखील सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

CAAवर भाजप वि. बाकी सगळे!

दरम्यान, बहुचर्चित नागरिकत्व सुधारणा विधेयकावर देखील या अग्रलेखातून भाजपवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. ‘या कायद्याचा फटका अनेक राज्यांत हिंदूंना देखील बसत आहे. त्यामुळे हिंदुही चिडले. भाजप विरुद्ध बाकी सर्व अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे भाजपची गोची झाली आहे. त्याच सूडभावनेतून अनेक उपद्व्याप केले जात आहेत. जेएनयूमधील राडा त्याचाच एक भाग आहे काय? अशी शंका आता येत आहे’, असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

- Advertisement -

#JNU Attack : गेट वे ऑफ इंडियावरचं आंदोलन पोलिसांनी थांबवलं!

पुरावे आहेत तर कारवाई का नाही?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर CAAवरून देशात दंगली घडवण्याचा आरोप केला होता. या आरोपाचा समाचार घेताना अग्रलेखात म्हटलं आहे, ‘गृहंमत्र्यांनी हा आरोप पुराव्यासह जबाबदारीने केला असेल, तर त्या पुराव्याच्या आधारे दंगल भडकवणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. दंगलखोरांना अटक करायला तुम्हाला कुणी रोखलं आहे का?’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -