घरमुंबईTata Recruitment : नर्स पदासाठी मोठी भरती!, अशी होणार निवड

Tata Recruitment : नर्स पदासाठी मोठी भरती!, अशी होणार निवड

Subscribe

पात्र असलेले उमेदवार टीएमसीच्या अधिकृत वेबसाइटवर tmc.gov.in वर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात

टाटा मेमोरियल सेंटर (टीएमसी) मधील नर्सच्या रिक्त पदांकरता मोठी भरती निघाली असून या पदासाठी अर्ज करण्यास पात्र असलेले उमेदवार टीएमसीच्या अधिकृत वेबसाइटवर tmc.gov.in वर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून ती १४ जूनपर्यंत सुरू राहणार आहे, त्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी या तारखेपर्यंत अर्ज करावेत. या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे देखील सांगण्यात येत आहे.

अशी होणार निवड

अधिकृत अधिसूचनेनुसार या पदासाठी अर्ज करण्याकरता उमेदवारांचे कमाल वय ३० वर्षे असावे. याशिवाय या पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल. उमेदवारांना टाटा मेमोरियल हॉस्पिटल, एचआरडी विभाग, सर्व्हिस ब्लॉक बीएलडीजी, चौथा मजला, डॉ. ई. बोर्गचा मार्ग, परळ-८०१ येथे मुलाखतीसाठी येणे गरजेचे असणार आहे.

- Advertisement -

इतर क्षेत्रातही नोकरीची संधी

या शिवाय बर्‍याच क्षेत्रातही नोकर्‍यांची संधी निर्माण झाली आहे. ईस्ट कोस्ट रेल्वेच्या विविध पदांवर रिक्त जागांकरता भरती आहे. त्यानुसार नर्सिंग सुपरिटेंडंट, फॉर्मलिस्ट, ड्रेसर / ओटी / हॉस्पिटल अटेंडंट या पदांवर ही भरती असणार आहे. एकूण ५६१ पदांसाठी नियुक्ती देण्यात येणार आहे. या नियुक्त्या वैद्यकीय विभागातील कोविड -१९ केअर सेंटरसाठी घेण्यात आल्या आहेत. कॉन्ट्रॅक्टच्या आधारे उमेदवारांना कामावर घेतले जाणार आहे.

युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, यूसीआयएल विविध पदांवर भरती करणार आहे. यानुसार, ग्रेज्युएट ऑरेशनल ट्रेनी (केमिकल), माइनिंग मेट-सी आणि इतर जागांकरता ही भरती असणार आहे. या पदांकरता दहावी, बारावी आणि पदवीधर युवकांना अर्ज करण्याची सुवर्ण संधी आहे. अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट ucil.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया आजपासून म्हणजेच १८ मेपासून सुरू होत असून २२ जूनपर्यंत सुरू असणार आहे.

- Advertisement -

देशात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -